Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurugram Crime: ‘नवऱ्याने मला बेदम मारहाण केली’… वडिलांशी झाला शेवटचा संवाद; काही तासांतच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

गुरुग्राममध्ये हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप असलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने वडिलांना फोन करून पतीकडून मारहाण झाल्याची माहिती दिली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 06, 2026 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहितेने मृत्यूपूर्वी वडिलांना फोन करून पतीकडून मारहाण झाल्याची तक्रार केली होती.
  • संशयास्पद मृत्यूनंतर पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
गुरुग्राम: गुरुग्राम मधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून विवाहितेने वडिलांना फोन करून, “नवऱ्याने मला बेदम मारहाण केली,” अशी व्यथा मांडली. मात्र, त्या फोननंतर अवघ्या काही तासांतच तिचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले असून, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव खुशबू गुप्ता असे आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अरविंद कुमार गुप्ता यांनी आपल्या मुलीचे लग्न हिमांशू गुप्ता याच्याशी लावून दिले होते. खुशबूचा पती, हिमांशू हा गुरुग्राममधील एका नामांकित कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आणि गेल्या दोन वर्षांपासून सेक्टर ३९ मधील एका भाड्याच्या घरात खुशबूसोबत राहत होता. लग्नानंतर लगेचच हिमांशू, त्याची आई आणि बहीण यांनी अतिरिक्त हुंड्याची मागणी करत खुशबूचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

Chattisgarh Crime: ‘तो मला मारहाण करतोय’… बहिणीला फोन, दुसऱ्याच दिवशी B.Ed विद्यार्थिनीची हत्या; नेमकं प्रकरण काय?

३ ऑगस्ट रोजी खुशबूने आपल्या वडिलांना फोन केला होता. तिने फोन करून सांगितले की हिमांशूने तिला जबर मारहाण केली आहे. त्याच रातराणी केव्हा खुशबूच्या कुटुंबीयांनी तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी सांगितले की खुशबूची प्रकृती अचानक खालावली. तिला रुग्णालयात घेऊन जात आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात खुशबूचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत खुशबूच्या वडिलांनी हिमांशू, त्याची आई सुनीता गुप्ता आणि बहीण अपराजिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लग्नाच्या काही दिवसात हिमांशु, त्याची आई आणि बहिणीने अतिरिक्त हुंड्याची मागणी करत खुशबूचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली अशी तक्रार खुशबूच्या वडिलांनी केली.

गुन्हा दाखल

त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, सदर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. एक विशेष पोलीस पथक आरोपी पती हिमांशू, सासू सुनीता आणि नणंद अपराजिता यांची चौकशी करत असून पुरावे गोळा केले जात आहेत असे पोलिसांनी सांगितले.

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहितेने मृत्यूपूर्वी कोणाला फोन केला होता?

    Ans: तिच्या वडिलांना.

  • Que: या प्रकरणात कोणाला ताब्यात घेण्यात आले?

    Ans: पती, सासू आणि नणंद.

  • Que: पोलिस सध्या कोणत्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत?

    Ans: शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवालाची.

Web Title: Gurugram crime my husband beat me mercilessly last conversation with father married woman dies under suspicious circumstances just hours later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.