rape
उदयपूर: राजस्थानमधील (Rajasthan) मावळी (Mavli) येथे एका 8 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार (Rape on 8 Years Old Girl) करून खून केल्याचा आरोप असलेल्या कमलेशविरुद्ध (Kamlesh) पोलिसांनी 22 दिवसांनंतर 306 पानी आरोपपत्र (FIR) सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, कमलेशने मुलीवर बलात्कार करून हत्या (Murder) करण्यापूर्वी 30 वेळा पॉर्न फिल्म पाहिली होती. यानंतर मुलीला घरी बोलावून कमलेशने मरेपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही आपल्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली.
पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात आरोपी कमलेश राजपूत हा मटणाच्या दुकानात काम करायचा, असे समोर आले आहे. त्यामुळेच निष्पाप मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या देहाचे चाकूने 10 तुकडे केले आणि ते बॅगमध्ये भरून बाथरूममध्ये लपवून ठेवले. हे कृत्य करताना त्याचे हात किंचितही थरथरले नाहीत. घटनेची माहिती कमलेशच्या पालकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी कळली. तिघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कमलेश हा मृतदेहाचे तुकडे भरलेली गोणी घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या निर्जन स्थळी (खंडर) टाकण्यासाठी गेला. दरम्यान, कमलेशचे वडील रामसिंग घराबाहेर उभे होते आणि आई किशन कंवर त्या ठिकाणी उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांपासून मुलाला सावध करत होती.
[read_also content=”CM योगींना धमकी देणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, प्रेयसीच्या वडिलांना अडकवण्याचा होता प्लॅन पण… https://www.navarashtra.com/crime/young-man-arrested-for-threatening-cm-yogi-girlfriends-father-had-a-plan-to-get-stuck-nrvb-391390.html”]
29 मार्च रोजी उदयपूरमधील मावळीच्या लोप्रा गावातून 8 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी मावळी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. १ एप्रिलला पोलिसांना मुलीचा मृतदेह सापडला आणि त्याच दिवशी आरोपी कमलेशलाही अटक करण्यात आली. मुलगी घरून शेताकडे जात होती. आरोपी कमलेश घरात एकटाच होता, त्याचे आई-वडील नव्हते. खिडकीजवळ बसून कमलेश मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. मुलीला जाताना पाहून त्याने हाक मारून तिला आत बोलावले. त्यानंतर तिला बाथरूममध्ये नेले. कमलेशच्या कृत्यामुळे मुलगी रडू लागली तेव्हा त्याने तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला उचलण्यास सुरुवात केली, मात्र मुलगी स्तब्ध पडून होती. मुलीचा मृत्यू झाल्याचे कमलेशला समजले.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]