
Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!
मृत रोहन भगवान सणस (वय ४०) आणि आरोपी राहुल भगवान सणस (वय ४५) हे दोघे खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील ओम वैभव को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होते. रोहन मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्याच्या उपचारांचा वाढता खर्च आणि घरातील सततच्या वादानुळे कुटुंबात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीला कंटाळून आरोपी राहुलची पत्नी आणि मुले मागील सहा महिन्यांपासून गावाला निघून गेली होती.
४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास रोहनचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे राहुलने भासवले व मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना अचानक शर्टची कॉलर सरकली आणि रोहनच्या गळ्यावर दोरीचे व्रण शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने शेजाऱ्यांनी तातडीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले.
तपासादरम्यान घराच्या पहिल्या मजल्यावरील बीमला नायलॉनची दोरी लटकलेली आढळली. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी राहुलची कसून चौकशी केली असता त्याच्या जबाबात विसंगती आढळली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच राहुलने आजारपणाच्या व खर्चाच्या त्रासाला कंटाळून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून भावाची हत्या केल्याची कबुली दिली. खांदेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ans: ही घटना खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील ओम वैभव को-ऑपरेटिव्ह सोसायटीत घडली आहे.
Ans: मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना शर्टची कॉलर सरकल्याने रोहनच्या गळ्यावरील दोरीचे व्रण शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
Ans: धाकट्या भावाच्या आजारपणाचा वाढता खर्च, त्यामुळे निर्माण झालेला तणाव आणि यामुळे पत्नी व मुले सोडून गेल्याच्या नैरात्रातून त्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.