Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने…

Factory Owner Kills Worker: "गावाला जातोय" सांगून मालक अचानक घरी परतला अन् मुलीच्या खोलीत कामगाराला पाहताच त्याचा थरकाप उडाला! बंगळुरूच्या येलहंकामध्ये २२ वर्षीय किरणला बंद खोलीत डांबून क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली. संतापाच्या भरात घेतलेल्या या बळीने संपूर्ण कर्नाटक हादरले आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 01:59 PM
Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने...

Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने...

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूत फॅक्टरी मालकाने कामगाराची क्रिकेट बॅटने केली हत्या
  • मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय
  • मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाल्याने मालकाला अटक
Factory Owner Kills Worker: बंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संतापातून एका फॅक्टरी मालकाने त्याच्याच २२ वर्षीय कामगाराला घरात डांबून क्रिकेट बॅटने अमानुष मारहाण केली. या भीषण मारहाणीत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या येलहंका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

नेमका घटनाक्रम कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद राज याचा येलहंका येथे स्वीट कॉर्न बनवण्याच्या मशीनचा कारखाना आहे. या कारखान्यात २२ वर्षीय किरण नावाचा तरुण काम करत होता. आनंद राज यांची १९ वर्षीय मुलगी म्हैसूर येथील वसतिगृहात राहून प्री-युनिव्हर्सिटी कोर्सच्या (PUC) दुसऱ्या वर्षात शिकते. दसऱ्याच्या सुट्ट्यांसाठी ती घरी आली असताना तिची आणि किरणची भेट झाली व दोघांमध्ये जवळीक वाढली. पोलिसांच्या मते, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते, मात्र हे संबंध आनंद राजला अजिबात मंजूर नव्हते.

गावाला जाण्याचा बनाव अन् रंगेहात पकडले

सोमवारी आनंद राज याने आपल्या मुलीला तामिळनाडूतील मूळ गावी जात असल्याचे सांगितले. मात्र, त्याच दिवशी दुपारी तो पत्नीसह अचानक घरी परतला. घरी पोहोचताच किरण आणि त्याची मुलगी एका खोलीत एकत्र असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आनंदने दोघांना रंगेहात पकडल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने तातडीने मुलीला तिच्या आईसोबत चिक्कबळ्ळापूर येथील एका नातेवाईकाच्या घरी पाठवून दिले आणि किरणला घरात बंद करून रात्रभर क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केली.

हेही वाचा: Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…

लाथ मारताच कोसळला अन् जागीच मृत्यू

दुसऱ्या दिवशी दुपारी संतापलेल्या आनंद राजने किरणच्या पोटाच्या खालच्या भागात जोरात लाथ मारली. या जबर फटक्यामुळे किरण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. किरण निपचित पडल्याचे पाहून घाबरलेल्या आरोपीने त्याला ऑटो-रिक्षातून रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच येलहंका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी फॅक्टरी मालक आनंद राज याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बंगळुरूमधील हत्येची ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बंगळुरूच्या येलहंका परिसरात घडली आहे.

  • Que: फॅक्टरी मालकाने कामगाराची हत्या का केली?

    Ans: फॅक्टरी मालकाच्या १९ वर्षीय मुलीचे कामगारासोबत प्रेमसंबंध होते, जे मालकाला मान्य नव्हते. दोघांना एकत्र पकडल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?

    Ans: येलहंका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी फॅक्टरी मालक आनंद राज याला अटक केली आहे.

Web Title: Bengaluru yelahanka factory owner kills worker cricket bat love affair sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Bengaluru
  • crime news
  • killing news
  • kills

संबंधित बातम्या

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!
1

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…
2

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…

हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी रचला सापळा; पाठलाग करून दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या
3

हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी रचला सापळा; पाठलाग करून दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी
4

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.