दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी रोज नवे प्रकार समोर येत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी पूर्ण देशात आक्रोश पाहायला मिळत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी मागणी प्रत्येकाकडून होत आहे. आफताबने श्रद्धाच्या हत्येची (shraddha aftab ameen case) प्लानिंग कशी केली असेल, तिला कसं मारलं असेल असे अनेक प्रश्न तुमच्या मनातही आलेच असतील. आता या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार आहे.
लवकरच हत्याकांडवर आधारित सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंग हृदयद्रावक हत्याकांडावर सिनेमा साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या कथेवर काम देखील सुरू झालं आहे. जोपर्यंत पोलीस चार्जशिट फाईल करत नाहीत तोपर्यंत सिनेमाची कथा निश्चित करता येणार नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.
वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली सिनेमा बनणार असून, त्यात कोणते कलाकार असतील हे अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे सिनेमात कोणते कलाकार असतील आणि सिनेमा कधी प्रदर्शित होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुलींची फसवणूक त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांचे कारस्थान करणाऱ्या आफताबचा चेहरा जगासमोर येणार आहे.