बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेच्या दिवसापासून फरार होते. काल या दोघांनाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या दोघांनी गेल्या काही दिवसात कुठे कुठे गेले, काय केलं, इतके दिवस कुठे राहिले यावर खुलासे केले आहेत.9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर इंगळे फरार झाले.
बीडमधून फरार झाल्यानंतर ते गुजरातला पळून गेले. गुजरातमधील एका देवस्थानात त्यांनी 3 जानेवारीपर्यंत मुक्काम केला. पण पैसे संपल्याने ते पुन्हा पुण्यात दाखल झाले. पुण्यात एका व्यक्तीला भेटून त्याच्याकडून पैसे घेऊन पुन्हा फरार होण्याचा त्याचा मानस होता. पण त्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. 4 जानेवारीला पहाटेच्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परवा म्हणजेच 3 जानेवारीला या प्रकरणातील डॉ. वायभसे दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली.
सुधीर मुनगंटीवार यांनी उलघडले राजकीय पत्ते; मंत्रिपद काढून घेतल्याबद्दल स्पष्टच बोलले
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण बीडमध्येच नव्हे तर राज्यभरात या प्रकऱणाचे पडसाद उमटले. विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरूवात केली. बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांन मूक मोर्चे काढण्यास सुरूवात केली. देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. पोलीस अधिकारी तपास करत होते. पण पोलिसांवरील दबाव वाढू लागल्यानंतर शोधमोहीम अधिक गतिमान करण्यात आली. त्यामुळे 3 जानेवारीपर्यंत जवळपास या प्रकऱणातले फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर या आरोपींना सीआयडीच्या स्वाधीन कऱण्यात आले.
घटनेनंतर फरार झालेल्या सुदर्शन, सुधीर आणि सिध्दार्थ सोनवणे या तीनही आरोपींना केज न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा दिला. त्यानंतर त्यांना नेकनूर पोलिस ठाण्यात आणले गेले. याठिकाणी एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनीही तिघांची कसून चौकशी केली. दोन-तीन दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेजवळचे पैसे संपले त्यामुळे कृष्णा आणि सुधीर महाराष्ट्रात आले होते. पण त्याची वाट न पाहता घुले आणि सुधीर हेदेखील त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झाले आणि इथेच फसले. ते पुण्यात एका व्यक्तीला भेटून त्याच्याकडून पैसे घेऊन पुन्हा फरार होणार होते. पण त्यापूर्वीच सापळा रचून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पण कृष्णा अजूनही फरार आहे. त्यामुळे आता तोही लवकरच जाळ्यात अडकेल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.
‘आमच्याकडे अणुबॉम्बइतके शक्तिशाली लढवय्ये आहेत’, तालिबानने पुन्हा पाकिस्तानवर ओढले
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी एकत्र होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले आणि तेथील एका शिवमंदिरात शरण घेतली. जवळपास १५ दिवस तिथेच थांबले. मंदिरातच त्यांची दिनचर्या होती, जेवण आणि झोपणे हे त्यांचे सर्वसाधारण कार्य होते. सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. त्या वेळी त्यांनी एका व्यक्तीचा मोबाइल घेतला आणि त्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बातमी यूट्यूबवर पाहिली. तिथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात राहण्याऐवजी गुजरातला पळून जाण्याचा निर्णय घेतला.
डॉ. संभाजी वायबसे आणि अॅड. सुरेखा वायबसे हे धारूर तालुक्यातील रहिवासी आहेत. घुले, आंधळे आणि सांगळे हे धारूर आणि केज तालुक्यातील रहिवासी असून वायबसे यांच्या कासारी गावापासून जवळ आहेत. वायबसे हे डॉक्टर असून ऊसतोड मुकादमही आहेत. यामुळे, जर एखादा कामगार पैसे घेऊन पळून गेला, तर ते घुलेच्या मदतीने त्याला दबाव टाकून परत आणत होते. घटनेनंतर घुलेने वायबसे यांना संपर्क केला होता. तसेच इतर तांत्रिक तपासांनी वायबसे आणि त्यांच्या पत्नीला ३ जानेवारी रोजी नांदेडमधून बीडला चौकशीसाठी आणले होते. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच घुले आणि सांगळे यांना अटक करण्यात आली.