crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड: बीड जिल्ह्यातून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाने पत्नीला विरह सहन न झाल्याने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव स्वाती नंदू नागरगोजे गर्जे (वय 22) असे आहे. स्वातीने तान्ह्या बाळाला घरी सोडले आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी समोर आली आहे.
अवघ्या चार दिवसापूर्वीच पतीने केली आत्महत्या
पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यापूर्वी आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता. हे दोघेही पुणे येथील शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती ही तीन महिन्यापूर्वी खिळद येथे गर्भवती असल्याने तिच्या आई- वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. चार दिवसांपूर्वीच स्वातीच्या पतीने पुण्यातील त्यांच्या भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या अंत्यविधी आणि सवडण्याचे कार्यक्रम आटोपून कुटुंब बुधवारी खिळद येथील गावी परतले.
पतीच्या निधनाचा धक्का स्वातीला सहन झाला नाही. याच विरहातून तिने गुरुवारी (१४ ऑगस्ट) पहाटे आपल्या तान्ह्या बाळाला घरात झोपलेले सोडून घरापासून अवलं असलेल्या विहरीत तिने उडी मारली आणि आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सातव,पोलीस अंमलदार शिवदास केदार आणि कृष्णा लव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव रितिक चौहान असून मूळचे नाशिकचे होते. २०२३ त्यांची पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांची नेमणूक भाईंदर पोलीस ठाण्यात होती. भरतीनंतर भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली येथे आपल्या आईसोबत भाडेतत्त्वावर राहत होते.
प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांची आई काही कामानिमित्त गावी गेली होती. गुरुवारी सकाळी त्याने घरातच गळफास घेतल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या म्हणण्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस दलात रुजू असलेल्या या शिपायाने आत्महत्या करण्याचं नक्की कारण काय किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन हे कृत्य केलं आहे का? खरंच ही आत्महत्या आहे की आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे, याबाबत प्राथमिक तपास पोलीसांकड़ून जारी आहे.