Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीची हत्या, नंतर मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्…; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना

तेलंगणातील हैदराबादमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले.दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. आरोपी डीआरडीओमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 23, 2025 | 05:15 PM
पत्नीची हत्या,नंतर मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना

पत्नीची हत्या,नंतर मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; हैदराबादमधील हृदयद्रावक घटना

Follow Us
Close
Follow Us:

हैदराबादमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. जिथे एका माजी सैनिकावर त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण श्रद्धा खून आणि मीरा रोड प्रकरणाशी बरेच साम्य आहे. याप्रकरणामध्ये पतीने मृतदेहाचे छोटे तुकडे केले आणि नंतर ते कुकरमध्ये शिजवले. एवढेच नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी आणि कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून शिजवलेले तुकडे मिरपेट तलावात फेकून दिले. याप्रकरणाचा सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी मुंबईत गुटखा एजंटचा सुळसुळाट, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने टपरी चालकांना देतात धमक्या

या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, सहा दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एक ३५ वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. यानंतर, तिच्या पतीने बुधवारी दावा केला की त्याने तिची हत्या केली आणि जिलेलगुडा तलावासह अनेक ठिकाणी तिच्या शरीराचे अवयव फेकून दिले.

पोलिसांनी धक्कादायक खुलासे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ४५ वर्षीय माजी सैनिकाच्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. आरोपी सैनिक म्हणतो की त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे कुकरमध्ये शिजवले. आरोपीचे नाव गुरुमूर्ती असे आहे. त्यांना पी वेंकट माधवी या महिलेच्या शरीराचा कोणताही भाग सापडला नाही, आरोपी गुरुमूर्तीने असा दावा केला आहे की त्याने शिजवलेले शरीराचे भाग फेकून दिले होते.

खरंतर, माधवी १६ जानेवारी रोजी हैदराबादच्या मीरपेट भागातून बेपत्ता झाली होती. गुरुमूर्ती यांचे माधवीशी १३ वर्षे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, मीरपेटमधील न्यू वेंकटेश्वर नगर कॉलनीतील रहिवासी गुरुमूर्ती १८ जानेवारी रोजी त्याच्या सासरच्या लोकांसह तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. परंतु सुरुवातीला त्याने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान, गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितले की १६ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर ती रागाच्या भरात घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. मात्र माधवीचा शोध जसजसा वाढत गेला तसतसे पोलिसांना तिच्या पतीवर संशय आला आणि त्यांनी त्याची पुन्हा चौकशी केली.

गुरुमूर्ती यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू होते. आरोपीने असेही सांगितले की, महिलेला संक्रांतीच्या सणासाठी आंध्र प्रदेशातील तिच्या मूळ गावी नांद्याल येथे जायचे होते आणि ज्या दिवशी ती बेपत्ता झाली त्या दिवशी तिचे भांडण झाले. त्याची दोन्ही मुले त्याच्या बहिणीच्या घरी होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मोठी बातमी! वाल्मीक कराडचा ‘या’ कारणामुळे जामीन अर्ज मागे; देशमुख हत्या प्रकरणात घडतंय तरी काय?

Web Title: Hyderabad news ex serviceman kills wife cooks body parts in pressure cooker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Hyderabad

संबंधित बातम्या

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?
1

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

AIr India Emergency Landing: अरे बापरे! १०३ प्रवाशांसह एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; उडाली धावपळ
2

AIr India Emergency Landing: अरे बापरे! १०३ प्रवाशांसह एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; उडाली धावपळ

Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली
3

Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली

Hyderabad Crime: देश हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या; नदीत हातपाय फेकले, धड घरात…
4

Hyderabad Crime: देश हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या; नदीत हातपाय फेकले, धड घरात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.