Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: देश हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या; नदीत हातपाय फेकले, धड घरात…

तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 25, 2025 | 12:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद: तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले. हत्या झालेल्या महिलेला ही पाच महिन्यांची गर्भवती होती. हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या बहिणीला फोन केला आणि सांगितले की त्याची पत्नी बेपत्ता आहे.

Delhi Crime: शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि…; आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली

नेमकं काय घडलं?

मृतक महिला स्वाती ही २१ वर्षाची असून तीच लग्न महेंद्र या व्यक्ती सोबत झालं होत. महेंद्र हा एका राईड-हेलिंग कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. स्वातीची हत्या शनिवारी 4:30 वाजताच्या सुमारास तिच्या पतीने केली. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि काही भाग नदीत फेकून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येनंतर महेंद्रने त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले की त्यांची पत्नी बेपत्ता आहे. त्यानंतर बहिणीला संशय आला आणि तिने एका नातेवाईकाला याबाबतची माहिती दिली, ज्याने तिला पोलीस ठाण्यात नेले. डीसीपी पी.व्ही. पद्मजा यांनी याप्रकरणी माहिती देताना म्हटलं की, चौकशीदरम्यान महेंद्रने हत्येची कबुली दिली.

नदीत टाकलेल्या मृतदेहांचे अवयवांचे शोध

पोलिसांनी आरोपी महेंद्रला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. गोतखोरांच्या मदतीने नदीत टाकलेल्या मृतदेहांचे अवयव शोधले जात आहे. फॉरेन्सिक टीमने महिलेच्या धडावरून पुरावे गोळा केले आहेत आणि ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. अद्याप एकही अवयव सापडला नाही आहे.

मृत महिलेच्या वडीलांनी काय सांगितले?

मृत गर्भवती विवाहितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे आणि जावयाशी असलेलं संबंध बिघडलेले होते आणि त्यांनी बोलणे बंद केले होते. ते म्हणाले, “माझी मुलगी म्हणायची की सर्व काही ठीक आहे, पण तो तिला सतत त्रास देत असे. त्यालाही माझ्या मुलीला जी शिक्षा दिली तीच शिक्षा मिळायला हवी.” पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि जलद तपास आणि कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

घरगुती वाद आणि संशय

महेंद्र आणि स्वातीचं २० जानेवारी २०२४ रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह केला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले पण लवकरच घरगुती वाद आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. एप्रिल २०२४ मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडाबळीची तक्रारही केली होती. गावातील पंचायतीमध्ये ते प्रकरण सोडवण्यात आलं. मात्र महेंद्रच्या मनातील संशय वाढतच गेला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

स्वातीही पाच महिन्यांची गर्भवती असतांनाही दांपत्यात भांडणे सुरूच होती. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला, त्याने २३ ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यांनतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करून डोके, हात, पाय नदीत फेकले, तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले.

Kolkata Crime: एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित, ब्लॅकमेल करत अत्याचार

Web Title: The country was shocked husband brutally murdered his pregnant wife on suspicion of her character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • crime
  • Hyderabad

संबंधित बातम्या

Maharashtra: परमेश्वराचे आम्हाला बोलावणे आले, आम्ही देहत्याग करत वैकुंठाला जाणार; २० जणांच्या निर्णयाने खळबळ, एकाच कुटुंबातील ५ जण
1

Maharashtra: परमेश्वराचे आम्हाला बोलावणे आले, आम्ही देहत्याग करत वैकुंठाला जाणार; २० जणांच्या निर्णयाने खळबळ, एकाच कुटुंबातील ५ जण

Kolkata Crime: एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित, ब्लॅकमेल करत अत्याचार
2

Kolkata Crime: एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित, ब्लॅकमेल करत अत्याचार

Delhi Crime: शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि…; आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली
3

Delhi Crime: शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि…; आईने दरवाजा उघडताच मुलगी रक्ताने माखलेली

Mumbai: मुंबईच्या नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला दिला चोप
4

Mumbai: मुंबईच्या नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला दिला चोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.