वाल्मीक कराडने जामीन अर्ज घेतला मागे (फोटो- टीम नवराष्ट्र)
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची देण्यात आली आहे. बीड न्यायालयाने खंडणी आणि मकोका प्रकरणी वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी दिली. या प्रकरणी आद सीआयडीने न्यायालयात सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. दरम्यान खंडणी प्रकरणात एक महत्वाची समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडने आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. आजच्या सुनावणीत कराडला जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वाल्मीक कराडने जामीन अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाल्मीक कराडची जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्याची प्रकृती देखील बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
वाल्मीक कराडची तब्येत खराब झाल्याचे त्याला उपचारांसाठी रूग्णायलयात दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे. वाल्मीक कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान आता खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडने जामीन अर्ज मागे घेतला आहे. वाल्मीक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात आला आहे.
हेही वाचा: Walmik Karad news Update: वाल्मिक कराडची सुटका नाही; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
31 डिसेंबरला वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. पुणे पोलिसांनी वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतरही वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी निदर्शनेही केली. पण संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनापुढे सर्मथक टिकू शकले नाही. खंडणी प्रकरणात कराडला सीआयडी कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत खंडणी प्रकरणात कराडला जामीन मंजूर करण्यात आला. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. खरंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. पण वाल्मिक कराडवर आता मकोका गुन्हाही दाखल झाल्यामुळे त्याला आता जामीन मिळणे अवघड मानले जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी 29 नोव्हेंबरचे काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यासह त्यांचे काही साथीदार सोबत दिसत आहेत. केज शहरात असलेल्या विष्णू चाटे याच्या कार्यालयात वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळेचे हे फुटेज व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटीलसुद्धा या व्हिडीओत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे कराडशी संबंधिच असलेल्या खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याची चर्चा आहे.