Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय शिंदेच्या थेट डोक्यात गोळी का मारली…? उच्च न्यायालयाचा थेट सवाल

बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 25, 2024 | 03:40 PM
अक्षय शिंदेच्या थेट डोक्यात गोळी का मारली…? उच्च न्यायालयाचा थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील बदलापूर एन्काऊंटरची सुनावणी सुरू असताना आज मुंबई उच्च न्यायालयाने चकमकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमदर्शनी, या चकमकीत काही गडबड असल्याचे दिसते. सामान्य माणूस पिस्तुलातून गोळीबार करू शकत नाही.  कारण त्यासाठी ताकद लागते, असे न्यायालयाने म्हटले आहे. एक कमकुवत माणूस हे करू शकत नाही कारण रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणे सोपे काम नाही, असे निरीक्षण न्यालायालयाने नोंदवले आहे.  अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, यावेळी न्यायालयाने एन्काऊंटरच्या घटनेंवरच संशय व्यक्त केला आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयाने या घटनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  हा एन्काऊंटर होऊच शकत नाही.  आरोपीवर गोळीबार करणे टाळता आले असते आणि पोलिसांनी त्याला आधी काबूत आणण्याचा प्रयत्न का केला नाही. तसेच आरोपीच्या पायात किंवा हाताला गोळी लावण्याऐवजी थेट डोक्यात गोळी का मारण्यात आली? आरोपीच्या मृत्यूचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: अन्यथा गय केली जाणार नाही”; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून हायकोर्टाचा सरकारला इशारा

बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या अकस्मात मृत्यूचीही नोंद केली आहे.या घटनेबाबत पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, सोमवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी शिंदेला त्याच्या पूर्व पत्नीने केलेल्या तक्रारीवरून दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे नेले जात होते. पण त्याचवेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: आता युतीत मलाच जागा नाही, त्यामुळे मी…; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पोलिसांसोबत झालेल्या या चकमकीत  अक्षय  शिंदे यांचा मृत्यू झाला. शिंदे (२४) याच्यावर बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.बदलापूर येथील एका शाळेतील कंत्राटी सफाई कामगार अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पाच दिवसांपूर्वी त्याने शाळेच्या स्वच्छतागृहात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते.

Web Title: In akshay shinde encounter case the high court directly questioned the police nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • Badlapur case
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
1

Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
2

मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.