Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांच्या घरी गुप्तचर विभागाचे पोलीस; घरात घुसून शूटिंग

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकऱणात आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आज सकाळीच त्यांनी दोन ट्विट करत त्यांनी थेट उपमख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 03, 2025 | 05:10 PM
Jitendra Awhad News:  जितेंद्र आव्हाडांच्या घरी गुप्तचर विभागाचे पोलीस; घरात घुसून शूटिंग
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या निवासस्थानावर गोपनीय विभागाची नजर असल्याचे समोर आले आहे. याचं कारण म्हणजे आज सकाळी जितेंद्र यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले. धक्कादायक म्हणजे पोलिसांकडूनच या पत्रकार परिषदेचं चित्रिकरण कऱण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईची महिती आव्हाडांना कळाली, त्यावेळी आव्हाड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी गुप्तचर विभागाचे पोलीस अधिकारी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत घुसले आणि त्यांनी पत्रकार परिषदेचे चित्रिकरणही केले. ही बाब जितेंद्र आव्हाडांना कळाल्यानंतर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर का वॉच ठेवत आहात? वॉच ठेवायचाच असेल तर तो वाल्मिक कराडवर ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात घुसलेच कसे, सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन केला. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस इथे येत नाहीत तोपर्यंत अंसही त्यांनी स्पष्ट केलं.

Big News: सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार, 300 जवानांचा जंगलाला वेढा

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकऱणात आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आज सकाळीच त्यांनी दोन ट्विट करत त्यांनी थेट उपमख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. “ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपित अधिकच धक्कादायक आहे. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चंदन गुप्ता हत्याकांडात कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व 28 दोषींना जन्मठेपेची शिक्षा

“आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, “आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने लागले आहेत.” वा रे… वाह ! आधुनिक महाराष्ट्र”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विट्समुळे पोलिसांनी त्यांच्यावर नजर तर ठेवली नसेल ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या… — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 2, 2025

Web Title: Intelligence department police at jitendra awhads house entered the house and shot nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
1

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
2

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
3

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल
4

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.