Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटनेते निवडीवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप करत विलासराव जगतापांनी व्यक्त केला संताप. सत्तास्थापनेचे समीकरण नव्या वळणावर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 09:37 PM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले
Follow Us
Follow Us:

 

  • सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..!
  • राजकीय वातावरण तापले
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली असली, तरी या निवडीची प्रशासकीय नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर कोणाचातरी दबाव असल्यामुळेच प्रक्रिया रखडवली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी केला.

जगताप म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी पक्षाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र प्रशासनाने अर्जात तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून प्रक्रिया थांबवली. सांगितलेल्या चुका दुरुस्त करून शुक्रवारी पुन्हा अर्ज सादर करण्यात आला, तरीही नव्याने त्रुटी काढण्यात आल्या. दिवसभर सदस्य व पदाधिकारी प्रतीक्षा करत असतानाच गट नोंदणी न करताच जिल्हाधिकारी निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम करू नये. कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे तेच करावे,” असे स्पष्ट करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात व्हीपच्या अधिकारावरून दोन दिवसांपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणे आवश्यक असताना जिल्हाध्यक्षांनी ते स्वतःकडे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नेत्यांमधील चर्चेनंतर व्हीप अधिकारासंदर्भातील पत्र नव्याने सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट केले. तरीही शुक्रवारी रात्रीपर्यंत गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.

Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार – गोपीचंद पडळकर

दरम्यान, जिल्हा परिषद सत्तास्थापनेबाबत भूमिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची शुक्रवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा अपेक्षित होती. मात्र जिल्ह्यातील कोणताही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीसोबत जाण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून दबाव असल्याची चर्चा असली तरी जिल्ह्यातील बहुतांश नेते महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेचे समीकरण आता नव्या राजकीय वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

अर्जातील नावांमध्ये त्रुटी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले सदस्य गट नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे गेले होते. अर्जाची तपासणी करताना सावित्री रवि-पाटील यांच्यासह एका सदस्याच्या नावात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने अर्ज दुरुस्त करून पुन्हा सादर करण्यास सांगितल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

Web Title: Sangli ncp ajit pawar group leader selection controversy political drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
1

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
2

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक
3

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
4

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.