
जळगावात मोठी टोळी गजाआड (फोटो सौजन्य - iStock)
Jalgaon Crime: भुसावळमध्ये थरार! पान टपरी लुटीचा प्रयत्न फसला अन् चालकावर थेट गोळीबार; परिसरात खळबळ
कोणते कलम लागू?
आरोपीं विरूद्ध CCTNS NO. ४२०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून पाचशेच्या एक हजार 65 नकली कागदी नोटा तसेच पाच अॅन्ड्राईड मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक सो. जळगांव, यांचा मार्गदर्शनात मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा पथकाने ही कारवाई केली.
अनेक गावातल्या व्यक्तींना दिले होते प्रलोभन
मुक्ताईनगर पोलीस ठाणे अंतर्गत कु-हा दुरक्षेत्रचे कार्यकक्षेतील मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा ता. मुक्ताईनगर अशा गावांत व परिरसरात वास्तव्यास असलेल्या काही गुन्हेगारवृत्तीच्या लोकांनी विविध समाजमाध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबदल्यात १० लाख रुपये देण्याचे आर्थिक प्रलोभन / आमिष देणे, सोन्याचे नाणी / विटा देणे, काळी हळद देणे, रेड मर्क्युरी, उल्टी वासन, नागमणी देणे असे सामान्य लोकांना प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारीत केले आहे.
सदर प्रलोभनाला बळी पडलेल्या देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना नमूद भागात बोलावून त्यांना मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रुपये व साहित्य लुटण्याचे प्रकार घडवून आणलेले आहेत. त्या बाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी सदर भागातील वरील प्रमाणे कृत्य करणा-या लोकांचे विरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक, आशिष अडसूळ यांनी RNO एजन्सीला दिली आहे.