काय घडलं नेमकं?
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या जळगाव नाका परिसरात उल्हास गणेश पाटील यांची पान टपरी आहे. पान टपरीवर चार अज्ञातांनी काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.यातूनच प्रतिकार करताना एका अज्ञाताने टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तेथून ते फरार झाले. यात उल्हास यांच्या टपरी चालकाच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चाकण–तळेगाव महामार्गावर टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक; मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू
पावसाळ्यात विजेचा धक्का लागून अनेक दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता जळगाव शहरातील अक्सानगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. घराच्या छतावर कपडे वाळवत असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये मुस्लिम धर्मगुरू शब्बीर खान आणि त्यांची मुलगी आलिया खान यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया खान छतावर कपडे वाळवत असताना तिच्या हाताला वीज वाहक तारेला स्पर्श झाला आणि तिला जागीच झटका बसला. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या शब्बीर खान यांनाही विजेचा जोरदार शॉक बसला आणि तेही जागीच मृत्यू पावले. दोघांना वाचवण्यासाठी आलेली शब्बीर खान यांची भाची मारिया खान गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान टपरीवर ही घटना घडली.
Ans: पान टपरी चालक उल्हास गणेश पाटील हे गोळीबारात जखमी झाले.
Ans: घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.






