Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने चढला सरपंचाचा पारा अन्…., नेमका प्रकार काय?

बिअर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ काढल्याच्या वादातून तरुणांवर दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सरपंचाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 28, 2026 | 05:08 PM
Jalgaon Crime News: हवेत गोळीबाराने जळगावात खळबळ; बारमधील देशी दारू विक्रीचा व्हिडिओ बनवल्याने सरपंचाचा राग अनावर

Jalgaon Crime News: हवेत गोळीबाराने जळगावात खळबळ; बारमधील देशी दारू विक्रीचा व्हिडिओ बनवल्याने सरपंचाचा राग अनावर

Follow Us
Follow Us:
  • देशी दारू विक्रीचा व्हिडिओ काढल्याने वाद
  • दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार
  • सरपंचाला अटक; कट्टा आणि काडतूस जप्त
Jalgaon Crime News: बिअर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ काढल्याच्या वादातून तरुणांवर दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्याधील यावल तालुक्यात घडला. या प्रकरणी कोळ न्हावी गावाचा सरपंच विकास सोलंके याला यावल पोलिसांनी अटक केली आहे. डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.

बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री होत असल्याचा आरोप 
मिळालेल्या माहितीनुसार, विकास सोलंके याचे गावाजवळच बिअर बारचे दुकान आहे. गुरुवारी रात्री डांभुर्णी येथील काही तरुण या बारमध्ये गेले होते. तेथे बिअर बारमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री होत असल्याचा आरोप करत संबंधित तरुणांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यावरून तरुण आणि विकास सोलंके यांच्यात जोरदार वाद झाला.

लेक अचानक गायब झाली अन् नंतर समोर आलं भयंकर सत्य; आईने पोलिसांच्या मदतीने थेट…; कल्याणमधील थरारक प्रकार

घाबरवण्यासाठी केला होता हवेत गोळीबार
व्हिडिओ चित्रीकरणावरून झालेल्या या वादाचा राग मनात धरून सोलंके याने संबंधित तरुणांना घाबरवण्यासाठी डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असलेल्या सोलंके याने जवळील गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी घेतले सरपंचला ताब्यात
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी रात्रभर शोध घेत शुक्रवारी पहाटे विकास सोलंके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकानेही पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले.

Nashik Crime News: हक्कसोड पत्रावरून भावाचा टोकाचा निर्णय; बहिणीच्या घरी भाच्याची हत्या

काही महीन्यापुर्वीच विकत घेतला होता गावठी कट्टा
दरम्यान, पोलिसांच्या तपासात सोलंके याने हा गावठी कट्टा सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. हा कट्टा कोणी विकला, त्याचा पुरवठा कुठून झाला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावात सध्या शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. दरम्यान, सरपंचासारख्या लोकप्रतिनिधीकडूनच सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे गोळीबार झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime shots fired in the air to intimidate sarpanch flies into a rage after a video is recordedwhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.