
Jalgaon Accident News: संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने साधला घाला; पाळधी-तरसोद बायपासवर तरुणाचा करुणास्पद अंत
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत योगेश राक्षे हे आव्हाणे परिसरातील एका खताच्या गोदामात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून ते आपल्या दुचाकीने घरी परतत होते. पाळधी रेल्वे पुलावर आले असता समोरून येणाऱ्या एका भरधाव आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे.
पाळधी-तरसोद बायपास मार्गावरील वाढती अपघातसंख्या आता अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनली आहे. गत ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव मुसळधार पावसामुळे खचला होता. त्यानंतर या बायपासवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरांतर्गत रस्त्यांवरून वळवण्यात आली. या निकृष्ट कामामुळे आणि वाहतुकीच्या ताणामुळे जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर तब्बल २५ लहान-मोठे अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल १३ जणांना आपला अमूल्य जीव गमवावा लागला आहे. ३ महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या योगेश यांच्या मृत्यूने प्रशासकीय दुर्लक्ष आणि महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Ans: हा अपघात पाळधी-तरसोद बायपासवरील पाळधी रेल्वे पुलावर दुचाकी आणि आयशर मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन घडला.
Ans: अपघातात आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरी करणारे योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला; त्यांचा ३ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
Ans: ३० जुलै रोजी भराव खचल्यापासून या मार्गावर २५ अपघात झाले असून त्यात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.