फोटो सौजन्य सोशल मिडिया
कोल्हापूर येथील कोडोली पोलिसांनी समर पोपट चव्हाण (वय १९) या तरुणाला अटक केली आहे. त्याने स्वतःच्या काकाच्या घरातून सुमारे 14.5 ते 15 तोळे सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत 14.5 लाख रुपये आहे) चोरले होते. ‘महिंद्रा थार’ ही नवीन गाडी खरेदी करण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हा गुन्हा केला.
कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात राहणारे उमेश चव्हाण यांच्या घरातून सोन्याचे दागिने गायब झाले. त्याच्या तिजोरीतून तब्बल १४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरले होते. या चोरी दरम्यान चोरीला गेलेले दागिने फक्त उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच असल्याचे समोर आले.यामुळे घरातीलच कोणावर तरी त्यांचा संशय निर्माण झाला. दागिने चोरीला गेल्यानंतर काही दिवसांनी उमेश चव्हाण यांचा पुतण्या समर चव्हाण याने एक नवी महागडी गाडी, ‘थार’ खरेदी केली आहे. गाडी घरी आणल्यानंतर त्याने आनंदाने आपल्याचं चुलत्याला म्हणजे उमेश चव्हाण यांना गाडीच्या पूजेसाठी बोलावले.
चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
घरात आधीच चोरी झाल्यामुळे उमेश चव्हान हे आधीच चिंतेत होते. त्यातच अचानक पुतण्याने एवढी महागडी गाडी खरेदी केल्यामुळे आणि त्यासाठी लागणारे पैसे कसे आले ? यामुळे चुलत्याचां संशय बळावला. उमेश चव्हाण यांनी या चोरीबाबत कोडोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल देण्यात आली.
कोडोली पोलिसांनी संशयाच्या आधारे पुतण्या समर चव्हाण याला अटक करण्यात आली. यानंतर त्याची कसून चौकशी केली गेली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या समरने अखेर पोलिसांसमोर गुन्ह्या केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, महागडी गाडी घेण्याच्या हव्यासापोटी त्याने चुलत्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरले होते. तसेच बाजारभावापेक्षा कमी दराने दागिने विकून ‘थार’ खरेदी केली.
पुतण्या समर चव्हाण यांने चुलत्याच्या पैशांवर मौज मस्ती केली, त्याच चुलत्याला गाडीच्या पूजेला बोलावल्याने या चोरीचा पोलासांनी पर्दाफाश केला. सध्या कोडोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Ans: पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात ही घटना घडली.
Ans: अंदाजे 14 लाख 50 हजार रुपये होती.
Ans: समर पोपट चव्हाण (वय १९) याला कोडोली पोलिसांनी अटक केली.






