तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याच्या साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यास कोकण व कर्नाटक भागातून मोटरसायकली चोरल्याची व तो शाहू टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली
आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
ग्रामीण व शहरी भागातील बेकायदेशीर सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे. प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने करून बेकायदेशीर सावकारीला आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्योजक राजीव जयकुमार पाटील यांच्या बंगल्यात गुरुवारी भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीचा शुक्रवारी पोलिसांनी उलगडा केला आहे. चालकानेच मालकाच्या ४४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समाेर आले आहे.
कोल्हापुरातील राजारामपुरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल ४० दिलस साखळदंडाने बांधून घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे महिलेच्या गळ्यात साखळदंड घालून कुलूप लावण्यात आलं होतं.
कसबा बावडा येथील अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सागर भगवान रेणुसे (वय ३६, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे.
हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय २६, रा. जवाहरनगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
१५ वर्षाच्या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस चेतन दिलीप घाटगेने तिची छेड काढल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते.