भारतीय राज्यघटनेतील कलम १६३ आहे तरी काय? कोलकाता आरजी कर रुग्णालयात लागू, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम (फोटो सौजन्य-ट्विटर)
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्य लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. शनिवारी सीबीआयने या संदर्भात रुग्णालयाच्या माजी प्राचार्याची जवळपास 13 तास चौकशी केली. दरम्यान रात्री उशिरा जमावाने रुग्णालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णालयाभोवती बीएनएस कलम १६३ लागू करण्यात आला.
या प्रतिबंधात्मक आदेशानुसार 24 ऑगस्टपर्यंत संबंधित परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर जाता येणार नाही. म्हणजेच गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात कल्याणमधील डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
कोलकाता पोलिसांनी आरजी कर रुग्णालय आणि रुग्णालयाभोवती भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ लागू केले आहे. शनिवारपासून 24 ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हे कलम आधी आयपीसी (भारतीय दंड संहिता) च्या काळात कलम 144 म्हणून ओळखले जात होते.
आता गर्दी जमू नये म्हणून कोलकाता पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात आणि आजूबाजूला कलम १६३ लागू करून ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच शस्त्र बाळगण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही क्रियाकलापांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा: कोलकातामध्ये आणखी एका मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न! तीन भामट्याना नागरिकांनी घेतलं ताब्यात
कोलकाता आरजी कर रुग्णालयात ९ ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे लैंगिक शोषन करुन हत्या करण्यात आली होती. डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या निषेधादरम्यान, 14 ऑगस्टच्या रात्री उशिरा शेकडो जमावाने अचानक रुग्णालयात घुसून तोडफोड केली. कोलकात्याच्या डॉक्टर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी टीएमसी नेतेही पुढे येत आहेत. आरजी कार हॉस्पिटलमधील हत्या आणि हल्ल्याबाबत काही नेते त्यांच्याच टीएमसी सरकारच्या भूमिकेवर नाराज असल्याचे मानले जाते. दरम्यान, राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी आपल्या पक्षाकडून वेगळी भूमिका घेत या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे सांगितले आहे.