कुर्ला बस अपघातातील आरोपीला 11 दिवसांची पोलीस कोठडी (फोटो सौजन्य-X)
मुंबई पोलिसांनी बेस्ट बस चालक संजय मोरे (50) याला अटक केली आहे. सोमवारी कुर्ला पश्चिम येथे या बसने पादचाऱ्यांना आणि अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले आहेत. मुंबई दुर्घटनेच्या कारणाचा तपास सुरू असून संजय मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडीही सुनवण्यात आली.
कुर्ला येथे बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-332 सोमवारी, 9 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला होता. या अपघातात 49 नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जेव्हा बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बस नियंत्रणाबाहेर गेली आणि 100 मीटर अंतरापर्यंत अनेक वाहनांना धडकली. या अपघातात अनेकजण बसखाली चिरडले गेले. या अपघातातील चौकशीत संजय मोरे याने इलेक्ट्रीक बसच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे अस्वस्थ असल्याचे उघड केले. तो १ डिसेंबरपासून बेस्टमध्ये रुजू झाला होका. यापूर्वी संजय मोरे यांनी खासगी कंत्राटदाराच्या मॅन्युअल ट्रान्समिशन बस चालवल्या होत्या. याप्रकरणी त्याने कबूल केले की ऑटोमॅटिक वाहनात क्लच नसल्यामुळे तो गाडी चालवताना गोंधळून गेला आणि हा अपघात घडला.
या अपघातासंदर्भात बेस्टचा चालक (डायव्हर) संजय मोरे याला न्यायालयात हजर केले. यावेळी चौकशी आणि तपासणी करण्यासाठी कुर्ला पोलीसकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तेव्हा न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत म्हणजेच 11 दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता याविरोधात ड्रायव्हर सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याचे कळते आहे.
अपघातानंतर पोलिसांनी संजय मोरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेले. चालू तपासाचा भाग म्हणून, अधिकारी संभाव्य यांत्रिक बिघाड आणि ड्रायव्हरच्या त्रुटींसह विविध घटक तपासत आहेत. मात्र, बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने अवजड वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 100 मीटरचे अंतर कापल्यानंतर बसने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने धावणाऱ्या दुचाकी आणि दोन ऑटोरिक्षांसह अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यातील एकाला पूर्णपणे चिरडले. एवढ्या वाहनांना धडक देऊनही चालकाला बस नियंत्रणात ठेवता आली नाही आणि त्याने अनेक पादचारी आणि वाहनांना धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, अखेर बस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल-वॉर्ड कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकर नगर गृहनिर्माण संकुलाच्या गेटवर थांबली.
जखमींवर भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलसह विविध वैद्यकीय सुविधांमध्ये उपचार सुरू आहेत.त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये चार पोलिसांचाही समावेश आहे जे घटनेच्या वेळी बंदोबस्तावर होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.