Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई- अमरावती या विमानसेवेच्या वेळापत्रकात पु्न्हा एकदा बदल होणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु असणार आहे.घनदाट धुक्याच्या समस्येमुळे १ ते १५ डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 06, 2026 | 12:02 PM
अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Follow Us
Close
Follow Us:
  • अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल
  • आठवड्यातून चार दिवस सुरु असणार
  • आठवड्यातून केवळ २ दिवसच उड्डाणे होत होती
Mumbai Amravati Flight News Marathi : एअर अलायन्सची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून ४ दिवस सुरू असतानाच पुन्हा एकदा तिच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. सोमवारी मुंबईहून दुपारी १२.०५ वाजता अमरावतीसाठी रवाना होऊन दुपारी १.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान करून सायंकाळी ४ वाजता मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, बुधवार (दि. ७) पासून ही सेवा पुन्हा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात येणार आहे.

घनदाट धुक्याच्या समस्येमुळे १ ते १५ डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सेवा सुरू झाली असली तरी आठवड्यातून केवळ २ दिवसच उड्डाणे होत होती आणि वेळापत्रकातही बदल करण्यात आले होते. शुक्रवारपासून आठवड्यातून ४ दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली. एअर अलायन्सने २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकानुसार महत्त्वाचे बदल केले होते. त्यानुसार मुंबई-अमरावती विमान सकाळी ७.०५ वाजता रवाना होऊन ८.५० वाजता अमरावतीला पोहोचत होते, तर अमरावती-मुंबई विमान सकाळी ९.१५ वाजता उड्डाण घेऊन १०.३० वाजता मुंबईत दाखल होत होते.

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

असे असणार विमानसेवा

ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार या ४ दिवसांसाठी उपलब्ध होती. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार मुंबईहून दुपारी ३.२५ वाजता निघणारे विमान सायंकाळी अमरावतीला पोहोचत असे आणि सायंकाळी ५.३५ वाजता मुंबईकडे रवाना होत असे. त्यामुळे मुंबईत पोहोचण्यास रात्री ७.२० वाजता, परिणामी प्रवाशांना दिवसभरातील कामांसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ही सेवा गैरसोयीची ठरत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत होती. याच कारणामुळे विमानसेवा सकाळच्या सत्रात हलविण्यात आली. मात्र, डिसेंबर महिन्यात सतत बदलणारे हवामान आणि घनदाट धुके त्यामुळे दृश्यतेची समस्या निर्माण झाली होती. याचा परिणाम विमानसेवेवर झाला असून, अनेकवेळा उड्डाणे रद्द करावी लागली.

डिसेंबरमध्ये १५ दिवसांसाठी ही सेवा बंद

दाट धुक्यामुळे १ ते १५ डिसेंबर दरम्यान विमानसेवा बंद करण्यात आली होती. नंतर, सेवा पुन्हा सुरू झाली, परंतु आठवड्यातून फक्त दोन दिवसच विमानसेवा सुरू झाली आणि वेळेतही बदल करण्यात आला. २ जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू झाली. अलायन्स एअरने २ ऑक्टोबरपासून त्यांच्या हिवाळ्यातील वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले. या योजनेचा एक भाग म्हणून, मुंबई-अमरावती विमानसेवा सकाळी ७:०५ ते ८:५० आणि अमरावती-मुंबई विमानसेवा सकाळी ९:१५ ते १०:३० पर्यंत होती. ही सेवा चार दिवस उपलब्ध होती: सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार.

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Web Title: Schedule for the amravati mumbai flight service has been changed news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • amravati
  • flight
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा
1

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…
3

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग
4

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.