Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: भाजप नेत्याने कारखाली चिरडून शेतकऱ्याला मारले; अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले

भाजप नेत्याने १५ साथीदारांसह शेतकऱ्यावर लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याला मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्यावर जीपने हल्ला केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2025 | 10:46 AM
Madhya Pradesh Crime News:

Madhya Pradesh Crime News:

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजप नेत्याचा टोळक्यासह शेतकऱ्यावर हल्ला
  • जीपखाली चिरडून शेतकऱ्याचा मृ्त्यू
  • हल्लेखोरांनी शेतकऱ्याच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलींचे कपडे फाडले

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून सुमारे १५ जणांच्या गटाने एका शेतकऱ्याला जीपने चिरडून त्याची हत्या केली. या घटनेत शेतकरी कुटुंबातील इतर चार सदस्यही जखमी झाले आहेत. या रक्तरंजित संघर्षात एका भाजप नेत्याचे नाव समोर येत आहे. भाजप नेत्याने शेतकऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ला करणाऱ्या भाजप नेत्याचे नाव महेंद्र नगर असल्याची माहिती आहे. तर हल्ल्यात मृत्यू झालेल्या ४० वर्षीय मृताचे नाव रामस्वरूप धाकड असे आहे.

या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा जिल्ह्याच्या फतेहगड पोलिस स्टेशन हद्दीतील गणेशपुरा गावात ही घटना घडली. रविवारी सहा एकर शेतजमिनीवरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. शेतकरी त्याच्या शेताकडे जात असताना भाजप नेत्याने त्याला थांबवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

Election Commission Of India: देशभरात SIR घोषणा होणार? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

रविवारी शेतात असलेल्या शेतकऱ्यावर काही जणांच्या टोळक्याने पहिल्यांदा काठ्या आणि रॉडने हल्ला केला. शेतकऱ्याने तिथून पळ काढताच त्याच्यावर जीपने हल्ला करण्यात आला. या हल्यात जीपखाली चिरडून शेतकरी गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भाजप नेत्याने १५ साथीदारांसह शेतकऱ्यावर लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याला मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्यावर जीपने हल्ला केला.

या हल्ल्यादरम्यान, शेतकऱ्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेतकऱ्याची पत्नी ३८ वर्षीय पत्नी विनोद बाई, १७ वर्षीय मुलगी कृष्णा नगर, १७ वर्षीय नातेवाईक तनिषा नगर आणि ५० वर्षीय राजेंद्र नागर हेदेखील गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी मृताची पत्नी विनोद बाई आणि दोन अल्पवयीन मुलींचे कपडेही फाडले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

Delhi Acid Attack: दिल्लीत DU च्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला! ओळखीच्या मुलासह तिघांनी केला हल्ला; आरोपींचा शोध सुरू

महेंद्र नगरवर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप

भाजपचे स्थानिक नेते महेंद्र नगर यांच्यावर गावातील लहान शेतकऱ्यांना धमकावून जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नगर यांनी आपल्या काही साथीदारांसह एका शेतकऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सदर घटनेत पीडित शेतकऱ्याचे हात-पाय तोडण्यात आल्याचा आणि त्याच्यावर थार जीप चालवून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही धमक्या देण्यात आल्या, तसेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन आणि हवेत गोळीबार केल्याचाही आरोप आहे.

जखमी शेतकऱ्याला तातडीची मदत मिळू नये म्हणून त्याला गावाबाहेर जाण्यापासून जवळपास एक तास रोखण्यात आले, अशीही माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली असून, संबंधित सर्व आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Madhya pradesh crime news bjp leader crushed farmer to death under car tore clothes of minor girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • Madhya Pradesh crime

संबंधित बातम्या

स्टंट पडला महागात, एका चुकीने बनला ‘हिरो से झिरो’! एकामागून एक सात बॉम्ब तोंडात फोडले, आठवा बॉम्ब ठेवला अन् मग…,
1

स्टंट पडला महागात, एका चुकीने बनला ‘हिरो से झिरो’! एकामागून एक सात बॉम्ब तोंडात फोडले, आठवा बॉम्ब ठेवला अन् मग…,

भारताच्या या ठिकाणी भरते सापांची न्यायसभा, स्वतः नागदेवता देतो न्याय; १०० वर्षांची अद्भुत परंपरा
2

भारताच्या या ठिकाणी भरते सापांची न्यायसभा, स्वतः नागदेवता देतो न्याय; १०० वर्षांची अद्भुत परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.