दिल्लीत DU च्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला! (Photo Credit- X)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एक अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भारत नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्या मुलाने ॲसिड हल्ला केला आहे. ही घटना रविवार, २६ ऑक्टोबर रोजी घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.`
On 26.10.2025, a call was received from Deep Chand Bandhu Hospital regarding the admission of a 20-year-old woman r/o Mukundpur, Delhi, with acid burn injuries. The victim stated that she is a 2nd-year (non-college) student and had gone to Laxmi Bai College, Ashok Vihar, for her… — ANI (@ANI) October 26, 2025
मुकुंदपूर येथील एका तरुणीला ॲसिडमुळे भाजलेल्या अवस्थेत दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपासानुसार, पीडित तरुणी पदवीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून, ती रविवारी अशोक बिहार येथील लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये अतिरिक्त वर्गासाठी जात होती. ती वाटेत असताना, मुकुंदपूरचा रहिवासी असलेला जितेंद्र हा त्याच्या ईशान आणि अरमान नावाच्या दोन मित्रांसह मोटारसायकलवरून तिथे आला.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ईशानने अरमानला ॲसिडची बाटली दिली आणि अरमानने तिच्यावर ॲसिड फेकले. तिने आपला चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिचे दोन्ही हात गंभीर भाजले आहेत. हल्ला होताच तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तातडीने आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी जितेंद्र हा तिचा सतत पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांच्यात यावरून जोरदार वादही झाला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेस्थळ आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पीडितेचा जबाब आणि जखमांचे स्वरूप लक्षात घेऊन, बीएनएसच्या (भारतीय न्याय संहिता) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई






