पश्चिम बंगाल : गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी कोलकातातील आरजी कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास 162 दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित करण्यात आले. सोमवारी (20 जानेवारी) सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. न्यायालयाने राज्य सरकारला मृतांच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले. निकाल देताना न्यायालयाने म्हटले की हा साधा गुन्हा नाही पण न्यायालयाने तो दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा मानला नाही.
संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. ” मी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधानी नाही. आम्ही सर्वांनी आरोपीला मृत्युदंडाची मागणी केली होती, पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मी समाधानी नाहीये.” ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, “आम्ही सुरुवातीपासूनच मृत्युदंडाची मागणी करत होतो, परंतु न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले नसते आणि आमच्या हाती असते तर खूप आधीच आम्ही त्याला फाशीची शिक्षा सुनावली असती.”
Delhi Assembly Elections: दिल्ली जिंकण्यासाठी भाजप टाकणार मोठा डाव; थेट ‘या’ हिंदुत्ववादी चेहऱ्याला
एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनीदेखील प्रतिक्रीया दिली आहे. “आरोपीला मृत्युदंड द्यायला हवा होता. पण तसेघडले नाही. पीडितेच्या कुटुंबाला पैसे नकोत. बंगालच्या लोकांना असे वाटत नाही की यामध्ये फक्त एकच व्यक्ती सामील होती, याची चौकशी झाली पाहिजे. संजयने ज्या लोकांची नावे घेतली आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हणायला हवे होते.”
दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट, जॉइंट फोरम ऑफ डॉक्टर्स आणि अभय मार्च निदर्शकांनी सियालदाह न्यायालयाबाहेर निदर्शने केली आहेत.
कोलकाताच्या सियालदाह सत्र न्यायालयाने अखेर आज (20 जानेवारी) या प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तथापि, संजय रॉय म्हणतात की त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. न्यायालयात, आरोपीने एक विचित्र युक्तिवाद केला आणि म्हटले की त्याने काहीही चुकीचे केले नाही. तो रुद्राक्षाची माळ घालतो, जर त्याच्याकडून काही चूक झाली असती तर घटनेच्या वेळीच माळ तुटली असती.
आरजी कार प्रकरणात, पीडितेच्या कुटुंबाने दोषीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, परंतु मृत महिला डॉक्टरच्या वडिल म्हणाले की, आम्हाला नुकसान भरपाई नाही तर न्याय हवा आहे.
गेल्या वर्षी 9 ऑगस्टच्या रात्री आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शरीराची अनेक हाडे, ज्यामध्ये पेल्विक आणि कॉलर हाडे अशा शरीराच्या अनेक अवयवांमध्ये अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली. या घटनेने केवळ पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देश हादरला. न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपास यंत्रणेने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर, न्यायालयाने शनिवारी संजय रॉय यांना दोषी ठरवले. या खटल्याची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली.