दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भाजप मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. दिल्लीत यंदा भाजप, आम आदमी पार्टी आणि कॉँग्रेस या तीन पक्षात मुख्य लढत होणार आहे. आम आदमी पक्ष, कॉँग्रेस आणि भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र भाजपने दिल्ली जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक मोठे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत. सभा, रॅली अशा माध्यमातून भाजप प्रचार करणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील दिल्लीत सभा आणि रॅलीला संबोधित करणार आहेत.
भाजपच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत येणार आहेत. योगी आदित्यनाथ 23 जानेवारीपासून 14 निवडणूक रॅली आणि सभांना संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीमध्ये भाजपच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. योगी २३ जानेवारीपासून १४ रॅली आणि सार्वजनिक कार्यक्रम घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीतील घोंडा, शाहदरा, द्वारका, बिजवासन, पालम, राजेंद्र नगर, पटेल नगर आणि इतर भागात प्रचार करणार आहेत.
नितीन गडकरी, CM देवेंद्र फडणवीस आता दिल्ली विधानसभेच्या मैदानात
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने तर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळेच भाजपने प्रचारासाठी देशभरातील मोठ्या नेत्यांची नेमणूक केली आहे. आज ४० स्टार प्रचारकांची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. नुकत्याच महाराष्ट्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळेच गडकरी आणि फडणवीसांना दिल्लीच्या प्रचारात उतरवण्यात आलं आहे.
नरेंद्र मोदी
जे.पी. नड्डा
अमित शाह
राजनाथ सिंह
नितिन गडकरी
पीयूष गोयल
शिवराज सिंह चौहान
मनोहर लाल खट्टर
धर्मेंद्र प्रधान
हरदीप सिंह पूरी
गिरिराज सिंह
योगी आदित्यनाथ
देवेंद्र फडणवीस
हिमंता विश्व सरमा
मोहन यादव
पुष्कर सिंह धामी
भजनलाल शर्मा
नायब सिंह सैनी
वीरेंद्र सचदेवा
वैजयंती पांडा
अतुल गर्ग
अलका गुर्जर
हर्ष मल्होत्रा
केशव प्रसाद मौर्या
प्रेमचंद बैरवा
सम्राट चौधरी
डॉ. हर्षवर्धन
हंसराज हंस
मनोज तिवारी
रामवीर सिंह बिधुड़ी
योगेंद्र चंडौला
कमलजीत सहरावत
प्रवीण खंडेलवाल
बांसुरी स्वराज
स्मृति ईरानी
अनुराग ठाकुर
हेमा मालिनी
रवि किशन
दिनेश लाल यादव निरहुआ
सरदार राजा इकबाल सिंह
दिल्ली जिंकण्यासाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय?
कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.