Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये अज्ञात लाल सूटकेस उघडताच पोलिसांना बसला धक्का; तमिळनाडू ते आग्रा प्रवासात नेमक घडलं काय?

आग्रा येथील कैंट रेल्वे स्थानकावरील ट्रेनमध्ये बेवारस पडलेल्या लाल सूटकेसमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ ऊडाली. सूटकेसमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानंतर तपासाचे धागे चेन्नईमार्गे थेट मणिपुरापर्यंत पोहोचले असून, ३८ वर्षीय हयात निशा यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला तमिळनाडू पोलिसांनी मणिपुरातून अटक केली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 30, 2026 | 04:42 PM
ट्रेनमध्ये अज्ञात लाल सूटकेस उघडताच पोलिसांना बसला धक्का; तमिळनाडू ते आग्रा प्रवासात नेमक घडलं काय?

ट्रेनमध्ये अज्ञात लाल सूटकेस उघडताच पोलिसांना बसला धक्का; तमिळनाडू ते आग्रा प्रवासात नेमक घडलं काय?

Follow Us
Follow Us:
  • आग्रा कैंट स्थानकावर आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
  • मृतदेहाचे तुकडे करून सूटकेसमधून आग्र्याकडे पाठवल्याचा संशय
  • छापा टाकून मुख्य आरोपीला करण्यात आली अटक
आग्रा: तमिळनाडू एक्स्प्रेसमधील लाल रंगाच्या एका सूटकेसमुळे महिलेच्या निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ६ ऑगस्ट रोजी आग्रा कैंट रेल्वे स्थानकावर या सूटकेसमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. असुन या प्रकरणातील मुख्य आरोपी माणिकुद्दीन लस्कर याला मणिपुरातून अटक करण्यात आली आहे.

लाल सूटकेसमधून मृतदेहाचे तुकडे

६ ऑगस्ट रोजी तमिळनाडू एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर धावत होती. ट्रेनच्या डब्यात प्रवाशांमध्ये एक लाल रंगाचा सूटकेस ठेवण्यात आला होता. सुरुवातीला या सूटकेसकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र, ट्रेन पुढे जात असताना त्यातून येणारी दुर्गंधी वाढत गेली. अखेर ट्रेन आग्रा कैंट रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूटकेस उघडला तर त्यामध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. मात्र मृतदेहाचे डोके गायब होते. त्यामुळे पोलिसांसमोर महिलेची ओळख पटवणे, कठीण झाले.

हेही वाचा:Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि…

CCTV फुटेजने तपासाला दिशा

पोलिसांनी तातडीने तमिळनाडू एक्स्प्रेसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच विविध रेल्वे स्थानकांवरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. लाल सूटकेस ट्रेनमध्ये कोठून आला, तो कोणी आणला आणि कोणत्या स्थानकावर ठेवण्यात आला, हे शोधण्यात येत होते. त्याच दरम्यान चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष आणि एक महिला लाल रंगाचा सूटकेस घेऊन जाताना दिसून आले. आग्रा कैंट स्थानकावर सापडलेला सूटकेस हाच असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला.

गुडुवांचेरीतील घरात आणखी धक्कादायक पुरावे

तपासात या दोघांची ओळख माणिकुद्दीन लस्कर आणि भगवती माजी अशी पटली. दोघेही चेन्नईतील गुडुवांचेरी परिसरातील एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या घराची झडती घेतली असता तेथेही महिलेच्या शरीराचे कापलेले तुकडे आढळून आले.  याशिवाय घरातून एक मोठे भांडेही पोलिसांच्या हाती लागले. या भांड्यातूनही मानवी शरीराचे काही तुकडे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यातील काही भाग सूटकेसमध्ये भरून ट्रेनमधून आग्र्याकडे पाठवण्यात आल्याचा संशय अधिक झाला.

मृत महिलेची ओळख पटली

पोलिसांच्या तपासात मृत महिलेची ओळख पटली, ती ३८ वर्षीय हयात निशा होती. त्यानंतर पोलिसांनी तिचे माणिकुद्दीन लस्कर आणि भगवती माजी यांच्याशी असलेले संबंध तपासण्यास सुरुवात केली. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, आरोपींचा मृतकाशी काय संबंध होता आणि या गुन्ह्यामागे आधिपासुनच कट होता का, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असतानाच माणिकुद्दीन आणि भगवती दोघेही चेन्नईतून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली.

Key accused arrested in the Guduvanchery murder case * A woman’s body was found chopped into pieces inside a suitcase on the Tamil Nadu Express.
* Manik Uddin Laskar and his wife, Bagapathi Maji, arrested as key accused.
* Both were arrested in Kashimpur, Jiribam District,… pic.twitter.com/V0ox9LKXSY
— Tamil Nadu Police (@tnpoliceoffl) August 29, 2026

मणिपुरात छापा, मुख्य आरोपी अटकेत

तपासादरम्यान माणिकुद्दीन लस्कर मणिपुरात असल्याची माहिती तमिळनाडू पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मणिपुरातील जिरीबाम जिल्ह्यातील काशिमपूर येथे कारवाई केली. या छाप्यात माणिकुद्दीन लस्कर याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला ट्रांझिट वॉरंटवर तमिळनाडूत आणले जात आहे. त्याची चौकशी केल्यानंतर हत्येचा नेमका घटनाक्रम आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पत्नीचा शोध सुरू

या प्रकरणात माणिकुद्दीन लस्कर आणि त्याची पत्नी भगवती माजी यांना मुख्य आरोपी म्हणून तपासले जात आहे. माणिकुद्दीन अटकेत असला तरी भगवती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

हत्येमागील कारण काय?

लाल सूटकेसमधून सुरू झालेल्या या प्रकरणात पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. हयात निशा यांची हत्या नेमकी का करण्यात आली? हत्येचे नियोजन आधीपासुन होते का? मृतदेहाचे इतक्या निर्घृण पद्धतीने तुकडे करण्यामागे नेमका उद्देश काय होता? मृतदेहाचे काही भाग घरात आणि काही भाग ट्रेनमधील सूटकेसमध्ये का ठेवण्यात आले? तसेच माणिकुद्दीन आणि भगवती यांच्याशिवाय आणखी कोणी या हत्येत सहभागी होते का, याचाही तपास सुरू आहे.

Web Title: Manipur police shocked upon opening an unidentified red suitcase on a train what exactly happened during the journey from tamil nadu to agra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.