Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्य घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदियांना भोगावाच लागणार तुरुंगवास, २० मार्च पर्यंत तिहार जेलमध्ये केली रवानगी; वाचा सविस्तर

सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या सात दिवसांपासून ते सीबीआयच्या कोठडीत होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 06, 2023 | 03:04 PM
manish sisodia sent to tihar jail will court extend cbi remanded in liquor scam case update nrvb

manish sisodia sent to tihar jail will court extend cbi remanded in liquor scam case update nrvb

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Delhi DCM) मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. सिसोदिया यांना आता तिहार तुरुंगात (Tihar Jail) नेण्यात येणार आहे. दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी (U) सीबीआयने सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक (Arrest) केली होती. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात (CBI Custody) होते.

सिसोदिया यांना सोमवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयने सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली. आम्ही पुढील पोलिस कोठडी मागत नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. पण भविष्यात त्याची मागणी करू शकतो, कारण आरोपीचे वर्तन योग्य नाही. त्यांना लक्ष्य केले जाण्याची भीती साक्षीदारांना आहे.

सिसोदिया यांनी कारवाईला राजकीय रंग दिला – CBI

ते साक्षीदारांना धमकावत कारवाईला राजकीय रंग देत असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतरच आम्ही छापा टाकल्याचे सीबीआयने म्हटले आहे. याप्रकरणी जी काही कारवाई झाली ते न्यायालयाच्या निदर्शनास आहे. सीबीआय बेकायदेशीर काम का करत असल्याचे दाखवले जात आहे, ही चिंतेची बाब आहे.

[read_also content=”मरण स्वस्त झालंय! कॉरिडॉरमध्ये फिरत असताना विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका, जागीच झाला खेळ खल्लास; पाहा VIDEO https://www.navarashtra.com/viral/truly-horrible-heart-attack-took-his-life-while-walking-in-the-corridor-the-student-suddenly-got-cardiac-arrest-died-on-the-spot-video-viral-nrvb-374144.html”]

ही मागणी मान्य करत न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सिसोदिया यांची बाजू मांडणारे वकील म्हणाले, ही माहिती योग्य नाही. मीडियाने माझा क्लायंट ड्रॅग करू नये.

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी आरोप केला की पीएम मोदींनी बिगरभाजप सरकारला राज्यांमध्ये सुरळीत काम करू न देण्याचा निर्णय घेतला आहे.

केजरीवाल यांनी आरोप केला की, देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रपिता मानले जाते, परंतु केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून भाजपेतर पक्षांमध्ये तेढ निर्माण करणे आणि राज्यांमध्ये त्यांची सरकारे पाडणे ही पंतप्रधान मोदींची कार्यशैली बनली आहे.

८ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव यांच्यासह ८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून विरोधी नेत्यांवर केंद्रीय एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप केजरीवाल यांचे विधान अशा वेळी आले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : ६ मार्च २०२३ ‘या’ राशीला आज चांगली बातमी मिळेल, उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थितीही चांगली असेल; वाचा तुमचं दैनिक भविष्य https://www.navarashtra.com/lifestyle/todays-horoscope-6-march-2023-cancer-will-get-good-news-today-financial-situation-will-also-be-good-due-to-additional-source-of-income-read-your-daily-rashibhavishya-in-marathi-nrvb-374186.html”]

काय प्रकरण आहे?

सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ६ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने सिसोदिया यांना या प्रकरणी अटक केली आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीत केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण आणून माफिया राजवट संपवण्याचा युक्तिवाद केला होता. यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल, असा दावाही करण्यात आला.

जुलै २०२२ मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना या प्रकरणी अहवाल सादर केला होता. यामध्ये अबकारी धोरणात अडथळे आणण्यासोबतच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दारू व्यावसायिकांना अवाजवी फायदा दिल्याचा आरोपही करण्यात आला. या अहवालाच्या आधारे सीबीआयने १७ ऑगस्ट २०२२ रोजी सिसोदिया यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Manish sisodia sent to tihar jail will court extend cbi remanded in liquor scam case update nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2023 | 03:04 PM

Topics:  

  • CBI
  • Manish Sisodia
  • sent

संबंधित बातम्या

Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स समूहाशी संबंधित ठिकाणांवर ईडीची कारवाई
1

Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स समूहाशी संबंधित ठिकाणांवर ईडीची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.