भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच...
पिंपरी : एमआयडीसी भोसरीमधील ब्राईट इंडिया टूल्स या दुकानातून ४० लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावरून मुंबईतील टोळीला एमआयडीसी भोसरी आणि गुन्हे शाखा युनिट पाचने धडक कारवाई करत अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हुसेनअली शौकतअली सय्यद (वय ४५, नाशिक. मूळ रा. उत्तर प्रदेश), सोहेल फकरुद्दीन कुरेशी (वय २५, गिरगाव मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश), असिफ युसूफ खान (वय ३९, सायन, मुंबई), अजमत अजगर अली (वय ४३, भेंडी बाजार, मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी गौरीशंकर हलकुडे यांचे एमआयडीसी भोसरीमध्ये ब्राईट इंडिया टूल्स नावाचे दुकान आहे. ११ जुलै रोजी त्यांच्या दुकानातून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे कार्बाईड टूल्स आणि कार्बाईड इन्सर्ट मटेरियल चोरीला गेले होते.
हेदेखील वाचा : Solapur crime: सोलापूर हादरलं! सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून केला खून, जेवण करत नाही आणि…
याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी शोध घेऊन चौघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंबईतून एमआयडीसी भोसरी परिसरात येऊन ही चोरी केली होती.
पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला; चार जणांच्या टोळीने लाथा- बुक्क्यांनी केली बेदम मारहाण