
crime (फोटो सौजन्य: social media)
मथुरा: उत्तरप्रदेश येथील मथुरामधून लैंगिक अत्याचाराची धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) मथुराच्या मागोर्रा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मागासवर्गीय समाजाची १० वर्षीय मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह गावाजवळील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. काही वेळाने मोठी बहीण कपडे धुऊन घरी परतली, तर चिमुकली तिथेच थांबली. त्याचवेळी दुचाकीवर दोन युवक तिथे आले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. हे पाहून त्यांनी मुलीला जवळच असलेल्या मंदिरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
बराच वेळ उलटला मात्र मुलगी घरी न परतल्याने तिची बहीण तिला शोधण्यासाठी पुन्हा विहिरीकडे गेली. तेव्हा तिला आपल्या पीडित बहिणीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तोही ताबडतोब त्या दिशेने धावली तेव्हा आरोपी तिथून पळून गेले. मोठ्या बहिणीने ताबडतोब गावकऱ्यांना बोलावले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी काय सांगितले ?
या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्ती केला आहे. याप्रकरणी मथुरेचे अपर पोलिस अधीक्षक अवनीश कुमार यांनी सांगितले की, “या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. मुलीचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून तपास जलदगतीने सुरू आहे.”
नागरिकांची मागणी काय ?
ही घटना मंदिरात घडल्याने समाजात संतापाचे वातावरण आहे. धार्मिक स्थळात अशा प्रकारचा घृणास्पद प्रकार घडल्याने लोकांनी दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस विभागाने आसपासच्या गावांतूनही आरोपींच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने पीडित परिवाराला पूर्ण न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर