
Shivraj Singh Chouhan Security,
Shivraj Singh Chouhan Threat : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने मध्य प्रदेशच्या डीजीपींना पत्र पाठवून, शिवराज सिंह चौहान हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या टार्गेटवर आहेत. आयएसआय शिवराज सिंह चौहान यांच्याशी संबंधित माहिती गोळा करत आहे.
भोपाळमधील ७४ बंगला येथील शिवराज सिंह चौहान यांच्या बी-८ या निवासस्थानाभोवती पोलिसांनी अतिरिक्त बॅरिकेड्स उभारले आहेत. दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शिवराज चौहान यांच्यात आयएसआय रस दाखवत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे आधीच झेड+ सुरक्षा होती, परंतु आता ही सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. (National News)
माहिती मिळाल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही शहरांमध्ये चौहान यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या भोपाळ बंगल्याबाहेर वाढलेली सुरक्षा व्यवस्था दिसून आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित केंद्रीय यंत्रणा तसेच मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) सुरक्षेबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, असे कडक आदेश दिले आहेत. यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्य सचिव हाय अलर्टवर राहतील, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष आयुक्त (सुरक्षा) यांनाही आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. (National News)
सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी
गृह मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रानुसार, आयएसआयकडून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांशी सल्लामसलत करून शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षाव्यवस्थेत आवश्यक ते बदल आणि समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
झेड+ सुरक्षेअंतर्गत कडक बंदोबस्त
शिवराज सिंह चौहान यांना यापूर्वीच झेड+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, जी देशातील सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थांपैकी एक मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडोसह सुमारे ५५ प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही माहिती उघड न करण्याचा निर्णय एजन्सीकडून घेण्यात आला आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर केंद्र सरकार सतर्क झाले असून, आगामी काळात शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेत आणखी कडक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.