वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा
दौंड : सध्या सर्वत्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर रोडरोमिओंनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील एका परीक्षा केंद्राबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करून वारंवार तिचा पाठलाग करण्यात आला. त्यामध्ये तिला मानसिक त्रास दिल्याची तसेच एवढ्यावरच न थांबता रोडरोमिओंनी तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
दौंड पोलिसांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेत दोन युवकांविरोधात पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अरबाज हुसेन शेख (रा.कस्तान चाळ, दौंड) व अनोळखी साथीदार यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीला पेपर झाल्यानंतर विद्यार्थिनी भेदरलेल्या अवस्थेत रडतच घरी गेली. आईने तिची विचारपूस केली असता तिने सांगितले की, पेपर सुटल्यानंतर ती घरी येत असताना आरोपी अरबाजने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तिच्या अंगाजवळून दुचाकी नेत तिला कट मारला. ती घराजवळ आली असता अरबाजने तिला फोन कर असा इशारा केला व तो निघून गेला.
शाळा बंद करतील…
घरचे आपली शाळा बंद करतील, या भीतीने ती गप्प होती. मात्र, त्रास असह्य झाल्याने तिने आईला सांगितले की, अरबाज वारंवार तिचा पाठलाग करून त्रास देतो. घडलेला सर्व प्रकार आईने मुलीच्या वडिलांना सांगितला. हे सर्व होत असताना फक्त मुलीची बाजू असल्याने ते सुद्धा शांत राहिले. नंतर विद्यार्थिनी व आई दोघेच घरी असताना अरबाज पुन्हा त्यांच्या घरासमोर आला व सिगारेट ओढत वाईट नजरेने मुलीकडे पाहात उभा राहिला. त्यामुळे दोघेही घरात निघून गेल्या. त्यांनी हा प्रकार सुद्धा आपल्या वडिलांना सांगितला. तरीही सगळे शांतच राहिले.
1 मार्चला पुन्हा…
1 मार्च रोजी पावणे दहाच्या दरम्यान येथील पोस्ट ऑफिस परिसरात अरबाज दुचाकीवर आपल्या साथीदारासोबत आला व त्यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. आपल्याबरोबर असणाऱ्या साथीदाराला त्याने त्यांना मारण्यास सांगितले. तेव्हा याला येथे नको, दुसरीकडे मारू असे साथीदाराने त्याला सांगितले. या प्रसंगानंतर मुलीचे वडील भीतीपोटी घरी गेले. अरबाजकडून कुटुंबाला होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहेत.