Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accident News: घरात सवत पाहताच संतापली पहिली पत्नी; चाकूने प्राणघातक हल्ला, नंतर ११२ क्रमांकावर नक्की काय घडलं?

मुंबई येथील विरारमध्ये पती दुसऱ्या पत्नीला अचानक घरी घेऊन आल्याने पहिल्या पत्नीचा संताप अनावर झाला आणि कौटुंबिक वादाला हिंसक वळण मिळाले. पहिल्या पत्नीने चाकूने केलेल्या हल्ल्यात दुसरी पत्नी जखमी झाली; मात्र तिने जखमी अवस्थेत ११२ हेल्पलाईनवर कॉल केल्याने पोलिसांनी तातडीने धाव घेत तिचा जीव वाचवला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 02, 2026 | 03:30 PM
Mumbai Accident News: घरात सवत पाहताच संतापली पहिली पत्नी; चाकूने प्राणघातक हल्ला, नंतर ११२ क्रमांकावर नक्की काय घडलं?

Mumbai Accident News: घरात सवत पाहताच संतापली पहिली पत्नी; चाकूने प्राणघातक हल्ला, नंतर ११२ क्रमांकावर नक्की काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या पत्नीच्या एन्ट्रीने संतापली पहिली पत्नी
  • थेट चाकू आणि त्रिशूळानं केला हल्ला
  • हल्ल्यानंतर ११२ हेल्पलाईन नंबरने वाचला जीव
Mumbai Accident News: पती दुसऱ्या पत्नीला अचानक घरी घेऊन आल्याने संतप्त झालेल्या पहिल्या पत्नीने तिच्यावर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याची घटना विरारमधील मे फेअर गार्डन परिसरात घडली. या हल्ल्यात २२ वर्षीय कोमल सरोज गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिने ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दार तोडत तिची सुटका केली.

पतीने गुपचूप केले दुसरे लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी प्रसाद (३१) ही महिला पतीसोबत मे फेअर गार्डन परिसरात राहत होती. तिच्या पतीने जुलै २०२६ मध्ये कोमल सरोज (२२) हिच्याशी दुसरा विवाह केल्याचे सांगण्यात येते. या विवाहाची माहिती पहिल्या पत्नीला नव्हती, असा आरोप आहे. रविवारी पती अचानक कोमलला घेऊन घरी आला. त्यामुळे लक्ष्मी आणि कोमल यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर लक्ष्मीने घराचा दरवाजा आतून बंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिने कोमलवर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

११२ वर कॉल करताच पोलिसांनी तोडले दार

हल्ल्यात जखमी झालेली कोमल जीव वाचवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. घरातून बाहेर पडणे शक्य नसल्याने तिने जखमी अवस्थेत ११२ क्रमांकावर फोन केला. कॉल मिळताच बोळींज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला आणि कोमलची सुटका केली. पोलिसांनी जखमी कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू

दरम्यान, बोळींज पोलिसांनी लक्ष्मी प्रसाद हिला अटक केली. तिला वसई न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील कौटुंबिक वाद आणि दुसऱ्या विवाहाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून हल्ल्याची नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्याचे काम सुरू आहे. जखमी महिलेने वेळीच ११२ हेल्पलाईनवर संपर्क केल्याने पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचता आले.

Web Title: Mumbai accident news first wife enraged upon seeing the other woman at home launched a lethal knife attackwhat exactly happened next when she called 112

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.