Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Black Magic Scam:”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

Black Magic Scam: दहा वर्षे घरात सुरू होती अंधश्रद्धेची काळी जादू! डायन आणि वाईट शक्तीची भीती दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याची ६ कोटींहून अधिक संपत्ती लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश... दहिसरमधील या धक्कादायक घटनेने हादरली मुंबई!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 01:26 PM
Black Magic Scam:"दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!"ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

Black Magic Scam:"दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!"ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

Follow Us
Follow Us:
  • जादूटोण्याच्या नावाखाली ज्येष्ठ दाम्पत्याची ६.३८ कोटींची फसवणूक
  • पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत चार फ्लॅट, शेअर्स व रोकड लुटली
  • पोलिसांनी मुख्य आरोपीसह १० जणांवर केला गुन्हा दाखल
Black Magic Scam: मुंबईच्या दहिसर परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. तंत्र-मंत्र, जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली एका सेवानिवृत्त ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल ६.३८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी या दाम्पत्याला तब्बल १० वर्षे अंधश्रद्धेच्या भयानक जाळ्यात अडकवून ठेवले होते. डायन, श्राप आणि वाईट शक्तींची भीती दाखवून त्यांची पद्धतशीरपणे आर्थिक लूट करण्यात आली. दहिसर पोलिसांकडून १३ नोव्हेंबर २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, परसिस दारा मेहता यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी उमेश देशपांडे याच्यासह १० जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

कशी सुरू झाली फसवणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये या फसवणुकीला सुरुवात झाली होती. दहिसर पूर्वेतील गायत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या परसिस मेहता यांची शेजारी मेघना इनामदार हिच्यामार्फत पनवेलमधील रमाबाई साने आणि उमेश देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्या कालावधीत परसिस यांचे पती दारा मेहता यांना तीन वेळा पक्षाघाताचा (लकवा) झटका आला होता. याच नाजूक परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे भासवून पूजा करण्याच्या नावाखाली सुरुवातीला ४० ग्रॅम सोन्याची साखळी आणि ३.८५ लाख रुपये उकळले.

काल्पनिक पात्रे आणि खोट्या कहाण्यांचा बनाव

आरोपींनी आपल्या गुन्ह्यासाठी अनेक काल्पनिक पात्रे आणि बनावट ओळखी तयार केल्या होत्या. मुख्य आरोपी उमेश देशपांडे हा आपला आवाज बदलून स्वतःला हैदराबादमधील मठाचा १०८ वर्षांचा ‘गुरुवर्य’ असल्याचे भासवत होता. तर अश्विनी गायकवाड ही स्नेहलता दीक्षित उर्फ ‘बाईसाहेब’, आणि वृषाली गायकवाड ही रमाबाई साने असल्याचे भासवत होती. रमाबाईची हत्या झाली असून बाईसाहेब यांनी कामशेत येथे समाधी घेतल्याच्या खोट्या कहाण्याही त्यांनी दाम्पत्याला सांगितल्या.

घरात अघोरी पूजा करणे, काळी बाहुली ठेवून प्रकार करणे तसेच नेपाळमधील साधूचे भस्म आणि सिंदूर दाम्पत्याला खाण्यास दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या संपत्तीवर डायन आणि वाईट शक्तींचा प्रभाव असून, जर या आदेशांचे पालन केले नाही तर पती आणि दोन्ही मुलांचा जीव धोक्यात येईल, अशी भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले गेले.

फ्लॅट, सोने आणि शेअर्स बळकावले

संपत्ती शुद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी दहिसर आणि बोरिवली येथील त्यांचे चार फ्लॅट विकण्यास भाग पाडले. या फ्लॅट विक्रीतून मिळालेले सुमारे ३.०२ कोटी रुपये आरोपींनी हडपले. याशिवाय, सुमारे १.६० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यास भाग पाडले, बँक आणि पोस्ट ऑफिसमधील ४५ लाख रुपयांची रोकड काढून घेतली आणि घरातील फर्निचरसुद्धा आपल्या ताब्यात घेतले.

मठ बांधण्याच्या नावाखाली एका साहूकाराकडून (सुदखोर) दरमहा ८ टक्के व्याजाने ४५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यासही त्यांना भाग पाडले गेले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी या दाम्पत्याचे तब्बल ९० लाख रुपये खर्च झाले.

हेही वाचा: Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

शेजाऱ्यामुळे बिंग फुटले आणि पोलिसांत तक्रार

जून २०२५ मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या या दाम्पत्याने हैदराबादला जाण्यासाठी शेजारी रवींद्र किणी यांच्याकडे २४ हजार रुपये उसने मागितले होते. दाम्पत्याची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून शेजाऱ्याला संशय आला आणि त्याने चौकशी सुरू केली. तपासात समोर आले की, आरोपींनी फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून गोरेगावच्या नागरी निवारा परिषद परिसरात अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत. मुख्य आरोपी उमेश देशपांडे याला दिंडोशी पोलिसांनी यापूर्वीच अन्य एका प्रकरणात अटक केली असून, दहिसर पोलीस इतर आरोपींचा व संपत्तीचा कसून शोध घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

  • Que: आरोपींनी ज्येष्ठ दाम्पत्याची कशी फसवणूक केली?

    Ans: तंत्र-मंत्र, जादूटोणा, अघोरी पूजा आणि डायन-व्हाईट शक्तींची भीती दाखवून, तसेच चार फ्लॅट, शेअर्स आणि रोख रक्कम असे मिळून तब्बल ६.३८ कोटी रुपये उकळले.

  • Que: या प्रकरणी कोणती कारवाई झाली आहे?

    Ans: परसिस मेहता यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेश देशपांडेसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mumbai dahisar senior couple black magic fraud 6 38 crore case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Black magic
  • Financial Scam
  • Mumbai crime news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.