Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा मोठा प्लॅन…? पोलिसांनी उधळला मोठा कट

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरातून बिश्नोई गँगच्या पाच शूटरना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी सात बंदुका आणि २१ जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 29, 2025 | 03:58 PM
Mumbai News: लॉरेन्स  बिश्नोई गँगचा पुन्हा मोठा प्लॅन…? पोलिसांनी उधळला मोठा कट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येपूर्वी अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेरही या गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक सेलिब्रिटी या गँगच्या हिटलिस्टवर आले आहेत. आता ही गँग अजून काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल. बिश्नोई गँगचे मोठे आव्हान आल्यामुळे राज्यातील पोलीस दलही हाय अलर्टवर आले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरातून बिश्नोई गँगच्या पाच शूटरना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी सात बंदुका आणि २१ जिवंत काडतूस जप्त केली आहेत. तपासादरम्यान एक महत्त्वाचा खुलासाही समोर आला आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी विकास ठाकुर याने चौकशीदरम्यान कबुली दिली आहे. आपण कुख्यात बिश्नोई गँगच्या संपर्कात होतो. असं त्याने कबूल केलं आहे. पोलिस तपास यापुढे या गँगच्या मुंबईतील हालचाली आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला जात आहे.

Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात

मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून अटक केलेल्या पाच शूटरांविरोधात मोठा कट उघडकीस आला आहे. हे पाचही शूटर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या आदेशानुसार मुंबईत दाखल झाले होते का, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिस तपासातून असेही उघड झाले आहे की या टोळीला मुंबईत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता आणि हल्ल्याची अंतिम माहिती गँगकडून प्रत्यक्ष भेटीत देण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि संभाव्य मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवले.

सूत्रांच्या माहितीनुसार, या शूटरांना हल्ल्यानंतर ५० लाख रुपयांची सुपारी देण्याचे आश्वासन दिले गेले होते. तथापि, ही सुपारी नेमकी कोणी दिली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, या कटाचा उद्देश मुंबईतील एका नामांकित व्यापाऱ्याची हत्या करणे हा होता.

मोठी बातमी ! हिंगण्यात राष्ट्रवादीला खिंडार; सर्व नगरसेवकांसह 16 सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश

अटक केलेल्या आरोपींची नावे-

विकास ठाकूर उर्फ विक्की, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता. हे सर्व आरोपी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यापैकी सुमित कुमार आणि विकास ठाकूर हे हिस्ट्रीशीटर असून त्यांच्याविरोधात आधीपासूनच गुन्हे नोंद आहेत. हे आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः, अभिनेता सलमान खानला सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे बिश्नोई गँग आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडावर आली आहे. अशा पार्श्वभूमीवर या पाच जणांची अटक व त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे मुंबईतील व्यापारी आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mumbai news lawrence bishnoi gangs big plan again police foil big conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Lawrence bishnoi Gang
  • Mumbai Crime
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा
1

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना
2

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक
3

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड
4

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.