'त्या' दोघींना जंगलात नेलं अन्..; अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Mumbai Crime News Marathi: गोरेगावमध्ये ३७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४३ वर्षीय तांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. तांत्रिकाने महिलेच्या पतीवर प्रथम उपचार करून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर महिलेच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. नंतर तांत्रिकाने काळ्या जादूद्वारे पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक वेळा अत्याचार करत राहीला. पोलिसांनी असेही सांगितले की, तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींचाही विनयभंग केला. जंगलात काळी जादू करून त्यांचे आजार बरे करण्याच्या बहाण्याने हे घृणास्पद कृत्य करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम यादव नावाच्या मांत्रिकाने एका ३७ वर्षांच्या महिलेवर तीनपेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. तसंच तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगही केला. या महिलेच्या पतीची प्रकृती जुलै २०२० पासून बिघडली आहे. त्याला बरं करतो, ठणठणीत करतो असं भासवून या राजाराम यादव नावाच्या आरोपीने महिलेवर अत्याचार केला. राजाराम यादव हा स्वतःला मांत्रिक म्हणवतो, तसंच तो रिक्षाही चालवतो. ज्या महिलेवर बलात्कार केला त्या महिलेच्या पतीने त्याला आपल्याला बरं करण्यासाठी जुलै २०२० नंतर घरी बोलवलं होतं. घरी आल्यानंतर त्याने लसूण आणि काही फुलं घेऊन जादूटोणा केला. तुझ्या नवऱ्यावर उपचार करतो आहे असं त्याने या पीडित महिलेला सांगितलं.
ही घटना घडल्यानंतर काही आठवडे गेले. या दरम्यान पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या राजाराम यादवला गावावरुन पुन्हा मुंबईत बोलवण्यात आलं. महिलेला गंभीर आजार झाला आहे. तिला बरं करायचं असेल तर काळी जादू करावी लागेल आणि तीनवेळा आपल्याशी शरीरसंबंध ठेवावा लागेल तरच हा आजार बरा होईल. महिलेने तसे करण्यास नकार दिला, परंतु तिच्या पतीने तिला राजी केले. तांत्रिकाने त्याला धमकीही दिली होती की जर वेळेवर उपचार केले नाहीत तर तो त्याच्या दोन्ही मुलींमध्ये हा आजार पसरेल.
महिलेने होकार दिल्यानंतर तांत्रिक यादवने तिच्यावर तीनदा अत्याचार केला. जेव्हा त्याने ते पुन्हा सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा महिलेने आक्षेप घेतला. त्यानंतर यादवने तिच्या पतीला काळी जादू करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. यामुळे कंटाळून ती महिला तिच्या गावी परत गेली. नंतर, तांत्रिक यादवने तक्रारदाराच्या पतीला सांगितले की, त्याच्या पत्नीचा आजार त्याच्या दोन्ही मुलींमध्ये पसरला आहे.
आरे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही मुलींना काळ्या जादूने बरे करण्याच्या बहाण्याने जंगलात नेले. तिथे त्याने तिचे कपडे काढले आणि काळी जादू करण्याच्या बहाण्याने तिचा अनेक वेळा विनयभंग केला. मोठ्या मुलीने तिच्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा ती मुंबईला परतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवर तात्काळ कारवाई करत, वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी एक पोलिस पथक तयार केले ज्याने यादवला अटक केली.