Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

रात्रीचा रस्ता… समोरून येणारा डंपर आणि काही क्षणांतच उडाला भीषण अपघाताचा थरकाप. धडकेनंतर कारचा असा चुराडा झाला की सातपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोघांनी प्राण सोडले. आता या भीषण दुर्घटनेत नेमकी चूक कोणाची, याचा तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 06, 2026 | 02:58 PM
Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • डंपरच्या धडकेत कारचा चक्काचूर
  • चौघांचा मृत्यू; तिघे गंभीर
  • डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात
 

मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री भरधाव कारला समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. लक्सर रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेत कारमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

रात्री १०.१५ वाजता भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. लक्सर रस्त्यावर समोरून येणाऱ्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आणि त्यातील प्रवासी वाहनात अडकले.

हेही वाचा: Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी… अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड

चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

अपघातात कारचालक आदेश कुमार आणि निशा यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी हायड्रा यंत्राची मदत घेतली. बचावकार्य करत सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. सध्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

अपघाताची माहिती मिळताच मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा, एसपी सिटी अमृत जैन, एसपी ट्रॅफिक अतुल कुमार चौबे आणि क्षेत्राधिकारी सुनील कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बचावकार्याचा आढावा घेत जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.

डंपर जप्त; चालक ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर जप्त केला असून, त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनांचा वेग किती होता आणि चालकाची चूक होती का, याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Muzaffarnagar laksar road car dumper accident four dead sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Accident News
  • Car Accident
  • latest news

संबंधित बातम्या

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
1

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
2

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
4

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.