
Nalasopara News: कुत्र्याला मारल्याच्या वादाचा भयानक बदला! ४०-५० जणांचा टोळका थेट घरात घुसला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी कुत्र्याला मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, या वादाचा राग मनात धरून सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ४० ते ५० अज्ञातांचा टोळका अचानक एका घरात घुसला. त्यांनी घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत धुमाकूळ घातला. घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत सर्व हल्लेखोर तेथून पसार झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त शंतनू बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पसार होण्यापूर्वी हल्लेखोरांनी ‘पुन्हा हल्ला करू’ अशी उघड धमकी दिली आहे. या धमकीमुळे भयभीत झालेल्या अनेक कुटुंबांनी आपली घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा कसून शोध घेत आहेत.
Ans: १ नोव्हेंबर रोजी कुत्र्याला मारल्याच्या वादावरून दोन गटांत भांडण झाले होते, याच वादाचा बदला घेण्यासाठी जमावाने घरात घुसून तोडफोड केली.
Ans: सुमारे ४० ते ५० अज्ञात व्यक्तींच्या जमावाने घरात घुसून हा हल्ला आणि तोडफोड केली.
Ans: पोलीस उपायुक्त शंतनू बोराटे यांनी पाहणी करून बंदोबस्त वाढवला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.