
crime(फोटो सौजन्य- social media)
काय नेमकं प्रकरण?
भाग्यश्रीच्या पतीच म्हणजेच गौरवकुमारच जगदीश चौधरी (वय 35) याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. भाग्यश्रीचा याला विरोध होता. अनेकदा तिने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा यश मिळालं नाही. त्यामुळे गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. भाग्यश्रीच्या माहेरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवून ठेवला. मात्र, दररोज होणारा त्रास हा असह्य्य झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत भाग्यश्री चौधरींच्या आईने फिर्याद दिली आहे. आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्रीच्या पती गौरवला आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली असून दोघांनाही कोर्टात हजर केले आहे. यात गौरव चौधरीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला
नंदुरबार येथून एक संतापजनक आणि धक्कदायक बातमी समोर आली आहे. सोरापाडा गावाजवळील वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात सुमारे सहा ते सात महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात आई- वडिलांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती आहे.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेकलं नदीत
२७ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलीस पाटील शरद वळवी याना नदीपात्रात नवजात बालकाचा मृतदेह आढळला.अज्ञात पालकांनी बाळाच्या जन्माची माहिती लपवण्यासाठी आणि मृतदेहाची गुप्त व्हिलेवात लावण्यासाठी ते नदीत फेकल्याचे प्राथमिक समोर आले आहे. संबंधित घटना वणव्यासारखी गावभर पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.
Ans: आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव भाग्यश्री गौरव चौधरी आहे.
Ans: पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळामुळे तिने आत्महत्या केली.
Ans: पती गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.