नंदुरबारात हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकून १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकमधून १ कोटींची अवैध दारू जप्त करून चालकाला अटक करण्यात आली.
नंदूरबारमध्ये भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. लग्नाच्या 10 दिवस आधी पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे; संतप्त नागरिकांनी वाहन जाळले.
नंदुरबारमध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळातून 29 वर्षीय विवाहित भाग्यश्री चौधरी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा–वरखेडी नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या पुरुष अर्भकाचा मृतदेह आढळला. अज्ञात पालकांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा-धडगावसारख्या दुर्गम भागात आजही बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाकडून कोट्यवधी निधी खर्च असूनही आरोग्य योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत.
Maharashtra Local Body Election : नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार डॉ. शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतली. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी व प्रमुख नेते…