महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आरोपीला मदत केल्याचा ठपका अधीक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.
वृद्ध महिलेला न बिबट्याने काही अंतरापर्यंत फरफटत व नेले होते. यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना न गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून, न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 जानेवारी रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रम राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. आज नंदुरबार शहरात बाईक रॅली आणि डीजिटल व्हॅनचा शुभारंभा करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. शरद पवार गटाला नंदूरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाराज नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांवर आरोप करत सामूहिक राजेनामे दिले आहेत.
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डॉ. गावित इच्छुक होत्या. मात्र, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती एकत्रित तयारी करत आहे. मात्र भाजप पक्षातील काही नेत्यांची शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने जहरी टीका केली असून थेट मुख्यमं...
मुहम्मद पैगंबर यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र ईदच्या जुलूसवेळी नंदुरबारमध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. आणि तुंबळ हाणामारी झाली. याचे व्हिडिओ आणि फोटो देखील काढण्यात आले. दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. मात्र अफवा पसरवण्यावर कडक का...