काय घडलं नेमकं?
कलबुर्गीच्या सलहल्लीची राहणारी कीर्तना नोकरीच्या शोधात दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी आली होती. काम न मिळाल्याने ती तिथंच राहत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तना गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर पोटदुखी आणि मासिक पाळीतील वेदनेमुळे त्रस्त होती. या वेदना इतक्या तीव्र होत्या की ती दिवसाचं नियमित कामही करू शकत नव्हती. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. एकटेपणा आणि असहाय्य वेदनेत तिने स्वत:चा जीव घेतला. कीर्तनाने आत्महत्या केल्याचे कळताच कुटुंबाला धक्काच बसला.
पोलीस तपास सुरु
कीर्तनाच्या आत्महत्येबाबत कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. नौकरी आणि चांगल्या करिअरच स्वप्न कीर्तना पाहत होती. यादरम्यान तिने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केलं जात आहे.
आजही सामान्य समजून दुर्लक्ष
आजही मासिक पाळी बद्दल खुलेपणाने बोललं जात नाही. मुली आजही मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासाला व्यक्त करत नाही. अनेक महिला या त्रासाला सामान्य समजून दुर्लक्ष करतात मात्र हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. जास्त त्रास झाल्यास डॉक्टरशी संपर्क करावे आणि योग्य ते उपचार घ्यावे.
कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…
Ans: कर्नाटकातील तुमकुरू येथे ही दुर्दैवी घटना घडली.
Ans: मासिक पाळीतील तीव्र पोटदुखी व दीर्घकालीन वेदना हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.
Ans: महिलांच्या आरोग्य समस्यांकडे, विशेषतः मासिक पाळीतील वेदनांकडे होणारं दुर्लक्ष.






