Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasarapur Crime News: शेळ्या, कोंबड्या, कुत्र्यांवरही अत्याचार…! नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा धक्कादायक इतिहास

पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या घरावर अटकेची नोटीस लावली असून ती त्याचा मुलगा धीरज कांबळे यांच्या नावाने देण्यात आली आहे. आरोपीच्या कुटुंबाबाबतही काही गंभीर प्रकार समोर आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 03, 2026 | 05:15 PM
Nasrapur Crime News, Accused History, Animal Abuse, Perversion,

Nasrapur Crime News, Accused History, Animal Abuse, Perversion,

Follow Us
Follow Us:
  • भीमराव कांबळे हा पूर्वीपासूनच विकृत प्रवृत्तीचा
  • २० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला गावातून हाकलून लावले होते
  • कांबळे हा कुत्र्यांवरही क्रूर अत्याचार करायचा
Nasarapur Crime News:  नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने न्यायालयात ‘मला किरकोळ मारामारीच्या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा’ असा दावा केला आहे.

दरम्यान, साम’वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या भूतकाळाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी कांबळेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भीमराव कांबळे हा पूर्वीपासूनच विकृत प्रवृत्तीचा असून सुमारे २० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला गावातून हाकलून लावले होते. गावात राहत असताना तो जनावरांवर अत्याचार करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

Amit Thackeray: “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?” नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी कांबळे हा शेतात शेळ्या चारताना त्यांच्यावर अत्याचार करायचा. इतकेच नव्हे तर कोंबड्यांवरही अत्याचार केल्याचे प्रकार समोर आले होते. काही महिलांवरही त्याने अत्याचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कांबळेच्या कृत्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका वयोवृद्ध महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

स्थानिकांच्या मते, आरोपी कांबळे हा कुत्र्यांवरही क्रूर अत्याचार करायचा. त्याच्या वागणुकीमुळे संपूर्ण गावाने त्याच्याशी संबंध तोडले होते. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात त्याला बोलावले जात नव्हते, तसेच गावकरी त्याच्यापासून दूर राहात होते.

Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या घरावर अटकेची नोटीस लावली असून ती त्याचा मुलगा धीरज कांबळे यांच्या नावाने देण्यात आली आहे. आरोपीच्या कुटुंबाबाबतही काही गंभीर प्रकार समोर आले आहे. आरोपी कांबळेचा मुलगाही असाच हिंसक प्रवृत्तीचा असल्याचा दावा ग्रामस्थां केला आहे.

या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Nasarapur crime news nasrapur accused a serial offender shocking history of animal abuse and perversion revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • Child Harassment
  • crime news marathi
  • Pune Police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
1

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
2

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Pune District Court: न्यायालय हजेरी की पर्यटनस्थळ? पुणे न्यायालयाचे मायक्रो सुरक्षा ऑडिट
3

Pune District Court: न्यायालय हजेरी की पर्यटनस्थळ? पुणे न्यायालयाचे मायक्रो सुरक्षा ऑडिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.