पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापुर टोल नाका येथे एका आयशर टेम्पोतून ७० लाखाचा गुटखा राजगड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
भोर शहरातील सम्राट चौकात शनिवार (दि.२) रात्री कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या आनंद गणेश सागळे या तरुणाचा खून करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.