Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Conversion Racket: टार्गेट ‘फिक्स’ अन् पुढचं नियोजन व्हॉट्सॲपवर! नाशिकच्या MNC कंपनीतील ‘कट्टरतेचा’ भयानक पॅटर्न उघड

आरोपींची कार्यपद्धती (Modus Operandi) अत्यंत नियोजनबद्ध होती. संशयित तरुण स्वतःला 'सिंगल' भासवून तरुणींशी जवळीक साधायचे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 10, 2026 | 02:16 PM
Nashik Conversion Racket: टार्गेट ‘फिक्स’ अन् पुढचं नियोजन व्हॉट्सॲपवर! नाशिकच्या MNC कंपनीतील ‘कट्टरतेचा’ भयानक पॅटर्न उघड
Follow Us
Close
Follow Us:

 

Nashik Conversion Racket: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (MNC IT) कंपनीत केवळ लैंगिक शोषणच नाही, तर संघटित धार्मिक कट्टरतेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींनी संगनमताने इतर धर्मीय तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांचे धर्मांतर करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’वर गुप्त गट (WhatsApp Groups) सक्रिय ठेवल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागली आहे.

व्हॉट्सॲपवर ठरायचे ‘पुढचे लक्ष्य’

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या एका विशिष्ट गटाचे दोन प्रकारचे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करण्यात आले होते. यामध्ये कोणत्या तरुणीला जाळ्यात कसे ओढायचे किंवा कोणाला ‘टार्गेट’ करायचे, याचे नियोजन केले जात होत. एकदा तरुणी जाळ्यात अडकली की, तिला एका स्वतंत्र ग्रुपमध्ये समाविष्ट करून तिचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा आणि तिला कट्टरतेकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात असे.

Conversion Racket: ब्रेनवॉश,धर्मांतर अन् लैंगिक शोषण… ! नाशिकच्या नामांकित कंपनीत ‘लव्ह जिहाद’चा पर्दाफाश 

संशयित आरोपी अत्यंत पद्धतशीरपणे तरुणींशी जवळीक साधत होते. सुरुवातीला स्वतःला अविवाहित असल्याचे सांगून, तरुणींचे कौतुक करणे आणि त्यांना कामात सवलती किंवा बदलीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्या तरुणींनी या प्रकारांना विरोध केला, त्यांना कंपनीत मानसिक त्रास देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

 

आमिष, फसवणूक आणि मानसिक छळ

आरोपींची कार्यपद्धती (Modus Operandi) अत्यंत नियोजनबद्ध होती. संशयित तरुण स्वतःला ‘सिंगल’ भासवून तरुणींशी जवळीक साधायचे. ऑफिसमधील कामाचा फायदा घेत, हव्या त्या ठिकाणी बदली (Transfer) किंवा रजा मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना उपकृत केले जात असे. ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला, त्यांना कामाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जाई. या त्रासाला कंटाळून अनेक पीडित तरुणींनी नोकरीचे राजीनामे दिल्याचेही समोर आले आहे.

“बाबा मला वाचवा”, मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण

गुन्हे दाखल; मुख्य आरोपी एसआयटी कोठडीत

नाशिक पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये केवळ तरुणच नाही, तर त्यांना मदत करणाऱ्या तरुणींचाही समावेश आहे.यात आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख यांना अटक करण्यात आली आहे. तर या कटात महत्त्वाची भूमिका निभावणारी निदा खान फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत.

राजकीय पडसाद आणि तणाव

या प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट असून राजकीय वातावरणही तापले आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने कंपनीच्या बाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कंपनी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता, ज्यामुळे दंगा नियंत्रण पथक (RCP) पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः कंपनीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

 

 

Web Title: Nashik conversion racket secret whatsapp groups exposed in multinational it firm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.