Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Conversion Racket: नाशिक महिला पोलिसांचे ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; ‘ते’ आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश

एका धाडसी तरुणीने पोलीस आयुक्तांकडे कैफियत मांडल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ महिला पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 10, 2026 | 03:43 PM
Nashik Conversion Racket: नाशिक महिला पोलिसांचे ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; ‘ते’ आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश
Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिकच्या आयटी कंपनीत नोकरीच्या नावाखाली धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा प्रकार
  • नाशिक महिला पोलिसांचे धाडसी ‘अंडरकव्हर ऑपरेशन
  • आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील तांत्रिक विश्लेषण सुरू
Nashik IT Company Conversion Case: नाशिकच्या आयटी कंपनीत नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. पण या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी चित्रपटालाही मागे टाकेल असे धाडसी ‘अंडरकव्हर ऑपरेशन’ राबवले आहे. एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर, सात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वतःची ओळख लपवून संबंधित कंपनीत नोकरी मिळवली आणि आरोपींच्या पापाचा पाढा पुराव्यासह वाचला.

महिला पोलिसांचे धाडसी मिशन

एका धाडसी तरुणीने पोलीस आयुक्तांकडे कैफियत मांडल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ महिला पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी स्वतःची खरी ओळख लपवून सामान्य उमेदवार म्हणून कंपनीत मुलाखत दिली. सलग आठ दिवस या महिला पोलिसांनी तिथे कर्मचारी म्हणून काम केले. मीटिंगमध्ये मुलींवर कसा दबाव टाकला जातो, त्यांचे मानसिक शोषण कसे केले जाते आणि धर्मांतरासाठी कशा प्रकारे प्रवृत्त केले जाते, याचे सर्व तांत्रिक पुरावे पोलिसांनी या काळात जमा केले.

Nashik Conversion Racket: टार्गेट ‘फिक्स’ अन् पुढचं नियोजन व्हॉट्सॲपवर! नाशिकच्या MNC कंपनीतील ‘कट्टरतेचा’ भयानक पॅटर्न उघड

पुराव्यांची साखळी पूर्ण होताच पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण ९ गुन्हे दाखल झाले असून यात ८ महिलांनी शोषण व धर्मांतराची, तर एका पुरुषाने धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारदारांमध्ये ६ अविवाहित तरुणी आणि २ विवाहित महिलांचा समावेश आहे. पीडित तरुणींनी या त्रासाबाबत कंपनीच्या HR विभागाला वारंवार माहिती दिली होती, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता

नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने ‘अंडरकव्हर ऑपरेशन’ राबवून हा प्रकार उघडकीस आणला, त्यामुळे एका मोठ्या संघटित गुन्हेगारी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी नोकरीच्या नावाखाली महाराष्ट्रातील इतर शहरांतही अशाच प्रकारे तरुणींना जाळ्यात ओढले जात आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, जप्त केलेल्या मोबाईल आणि तांत्रिक पुराव्यांतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

प्रशासनाची भूमिका: ‘प्रकरण अतिशय गंभीर’

या तपासाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले की, “हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. पोलिसांनी विशेष पथकामार्फत सर्व आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्राथमिक तपासावरून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.”

दुकानातील ‘चेंजिंग रूम’मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

पुण्यातून महिला HR ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तिची सलग ४ तास कसून चौकशी करण्यात आली असून, तिला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा किती सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींपैकी पाच जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. एक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार असून, पोलीस पथके तिचा कसून शोध घेत आहेत.

 

Web Title: Nashik conversion racket secret whatsapp groups exposed in multinational it firm 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Nashik Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.