
Nashik Crime News: हक्कसोड पत्रावरून भावाचा टोकाचा निर्णय; बहिणीच्या घरी भाच्याची हत्या
Delhi Crime: मुस्कान हत्या प्रकरणात मोठे वळण; CCTV फुटेजमुळे तपासाला वेग
इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. शेतजमिनीच्या हक्कसोड पत्रावरून देहाडे आणि उबाळे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. हक्कसोड पत्र करून देत नसल्याच्या रागातून आरोपींसह सुमारे १० ते १२ जणांचा जमाव चित्रा देहाडे यांच्या घरावर आला. जमावाने घराचा दरवाजा आणि खिडक्या तोडून आत प्रवेश केला.
यावेळी आरोपींनी चित्रा देहाडे यांना बळजबरीने पकडून ठेवले. तसेच त्यांच्या वृद्ध सासूच्या डोळ्यांसमोरच संजय देहाडे यांच्या डोक्यात आणि पायावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या संजय यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. घरात घुसून झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुलभा सांगळे यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत संजय देहाडे यांच्या पत्नी चित्रा देहाडे आणि त्यांच्या ९० वर्षीय आईची प्रत्यक्षदर्शी साक्ष महत्त्वाची ठरली. हल्ल्यावेळी दोघीही घटनास्थळी उपस्थित होत्या.
न्यायालयात साक्ष देताना चित्रा देहाडे यांनी पतीवर हल्ला होत असताना आपण मदतीसाठी आक्रोश केला, मात्र आरोपींनी दया दाखवली नाही, असे सांगितले. तर ९० वर्षीय वृद्ध आईने आपल्या मुलाच्या हत्येसाठी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयासमोर केली.
Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
तत्कालीन पोलीस निरीक्षक तसरे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले पुरावे आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आले.
तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने महेंद्र पटवर्धन उबाळे आणि यशवंत उर्फ गोट्या पटवर्धन उबाळे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जमिनीच्या हक्कासाठी सुरू झालेल्या वादाचा शेवट एका कुटुंबातील व्यक्तीच्या हत्येत झाला होता. आता न्यायालयाच्या निकालामुळे पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, परिसरातही समाधान व्यक्त केले जात आहे.