Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: नाशिकच्या आश्रमशाळेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; ताप-उलटीनंतर अचानक प्रकृती खालावली

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असतानाच नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ताप आणि उलटीनंतर आठ वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला; मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 04, 2026 | 04:43 PM
Nashik News: नाशिकच्या आश्रमशाळेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; ताप-उलटीनंतर अचानक प्रकृती खालावली

Nashik News: नाशिकच्या आश्रमशाळेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू; ताप-उलटीनंतर अचानक प्रकृती खालावली

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवस उपचार, अचानक उलटी अन् प्रकृती बिघडली
  • अन्नातून विषबाधेचा संशय? शवविच्छेदन अहवालानंतर उलगडा
  • नाशिकमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
नाशिक: आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर येत असतानाच नाशिकमध्ये आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसरवाडी परिसरातील आश्रमशाळेत ही घटना घडली. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी ही विसापूर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. आश्रमशाळेत असतानाच तिला ताप आला. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र त्यानंतर अचानक तिला उलटी झाली. ताप आणि उलटीचा त्रास पुन्हा जाणवू लागल्याने सृष्टीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

सृष्टीला ताप आल्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. उलट उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याचे सांगण्यात येत आहे. आश्रमशाळेत परतल्यानंतर तिला पुन्हा अचानक उलटी झाली आणि त्यानंतर तापाचा त्रासही वाढला. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

सृष्टीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विद्यार्थिनीचा मृत्यू आजारपणामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सृष्टीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात संतापजनक घटना; सर्व विद्यार्थी उतरल्यावर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा घेतला गैरफायदा

अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सृष्टीच्या प्रकृती बिघडण्यामागे अन्नातून विषबाधेचा काही संबंध आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सध्या याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल तसेच संबंधित आरोग्य व प्रशासन यंत्रणांच्या तपासातूनच या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांना दिले जाणारे अन्न आणि आरोग्यविषयक सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सृष्टीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nashik news 8 year old girl dies at a residential school in nashik condition deteriorated suddenly following fever and vomiting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.