Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik TCS Case: मुख्य संशयित निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nashik TCS Conversion Case- टीसीएस प्रकरणातील तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 05:30 PM
Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashikroad Court,

Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashikroad Court,

Follow Us
Close
Follow Us:
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
  • मागील पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी निदा आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी
  • निदा खान गरोदर असल्याने पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मागण्यासाठी न्यायालयात फारसा आग्रह धरला नाही.
Nashik TCS Case Nida Khan:नाशिकमधील टीसीएस कंपनीतील (TCS) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी निदा खानला आज नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलयाने निदाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, निदा खानच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, आजची सुनावणीही इन कॅमेरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. निदा खान गरोदर असल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाऊ शकते असेही बोलले जात होते. पण तिला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले.

Nashik TCS Conversion Case: निदा खानला आश्रय देणारा कोण आहे .

निदा खानला न्यायालयीन कोठडी

निदा खानचाच्या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. विशेष म्हणजे, पोलिसांनी निदा खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी फारसा आग्रह धरला नसल्याचे दिसून आले. निदा खान गरोदर असल्याने तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी करण्यात आली. आता तिला पोलीस कोठडीतून मुक्त करत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, टीसीएस प्रकरणातील तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धार्मिक शिक्षण देत पीडितेला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद …

तपासादरम्यान पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल १७१ लिंक पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. धार्मिक व्हिडिओ आणि ऑनलाइन सामग्रीच्या माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या लिंक नेमक्या कुठून पाठवण्यात आल्या आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. तसेच पीडितेला विशिष्ट पद्धतीने प्रार्थना आणि वर्तन करण्यास भाग पाडल्याचेही तपासात समोर आले आहे.

एकीकडे निदा खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असताना, दुसरीकडे या प्रकरणातील इतर संशयित आरोपींनी Nashik District and Sessions Court येथे जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर लवकरच सुनावणी होणार असून, न्यायालय आरोपींना दिलासा देणार की त्यांची कोठडी कायम ठेवणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Nashik tcs case main accused nida khan sent to 14 day judicial custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.