Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई

Nida Khan Arrested: या प्रकरणातील इतर दोन आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांनाही पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 08, 2026 | 01:20 PM
Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashik SIT, Nida Khan Arrested,

Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashik SIT, Nida Khan Arrested,

Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव, कौसर कॉलनी येथील एका निर्जन इमारतीत ती लपली
  • तांत्रिक तपासाद्वारे लोकेशन मिळाल्यावर पोलिसांनी सलग दोन दिवस इमारतीवर पाळत
  • निदा खानने गरोदर असल्याचा दावा करून जामीन मागितला होता
 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकच्या टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतर प्रकरणातील फरार असलेली मुख्य सूत्रधार निदा खानला अटक करण्यात आली आहे. नाशिक एसआयटी आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून गेल्या 40 दिवसांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे ती अशा ठिकाणी लपली होती, जिथे पोहचणे पोलिसांसाठीही मोठे आव्हान होते.

अटकेपासून वाचण्यासाठी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी परिसरात लपून बसली होती. ती ज्या इमारतीत लपून बसली होती, त्या इमारतीच्या आजूबाजूला दूरदूरपर्यंत एकही घर नव्हते. हा परिसर फारसा वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्यामुळे कोणाला संशयही येणार नाही, असे तिला वाटले होते. त्यामुळे पोलिसांपासून वाचण्यासाठी ती या इमारतीत लपून बसली होती.

TCS Nashik case: TCS नाशिक प्रकरणात मोठा खुलासा; मास्टरमाइंड निदा .

दोन दिवस पोलिसांचा ‘वॉच’, मध्यरात्री छापा

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही तिच्या आई-वडील, भाऊ आणि आत्यासह संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. तांत्रिक तपास आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे ती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री नाशिक एसआयटीला पटली होती. त्यानंतर पोलिसांनी सलग दोन दिवस संबंधित इमारतीवर गुप्तपणे नजर ठेवली. ती फ्लॅटमध्येच असल्याची खात्री झाल्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकत तिला अटक केली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशी सुरू केली आहे.

 

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कारवाई

दरम्यान, निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका “आंतरराष्ट्रीय सिंडिकेट”शी संबंधित असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी तिला अटक केली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis On TCS Case: “कोणालाही पाठीशी…TCS प्रकरण हा …

दोन आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी

याशिवाय या प्रकरणातील इतर दोन आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांनाही पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर करण्यात आला आहे. याशिवाय फिर्यादीला दिलेल्या कथित गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि संभाव्य नेटवर्क याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

निदा खानच्या अटकेनंतर या कथित धर्मांतरण रॅकेटचे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Web Title: Nashik tcs conversion case main accused nida khan arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Nashik Crime
  • Religion Conversion
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?
1

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.